Beej Graam Yojana | आता अर्ध्या किमतीत शेतकऱ्यांना मिळणार चांगल्या प्रतीचे बियाणे, घ्या या योजनेचा लाभ

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Beej Graam Yojana | मित्रांनो जर शेतकऱ्यांना चांगले उत्पादन पाहिजे, असेल तर त्यासाठी शेतकऱ्यांना चांगल्या प्रतीचे बियाणे वापरणे देखील गरजेचे असते. परंतु अनेक शेतकऱ्यांना याची माहिती नसते त्यामुळे त्यांना कोणते बियाणे निवडावे हेच समजत नाही आणि त्यामुळे त्यांना मोठे नुकसान सहन करावे.

आजकाल बाजारात फसव्या बियाण्यांचा प्रसार मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे. त्यामुळे आता बनावट आणि खऱ्या बियाणांमधील फरक ओळखणे कोणालाही जमत नाही . परंतु जर तुम्हाला हा फरक ओळखता आला नाही तर नंतर तुम्हाला त्याच्या आर्थिक नुकसान सहन करावे लागते. कारण जर बियाणे चांगली नसतील तर शेतकऱ्यांना त्याचा चांगले उत्पादन मिळत नाही.

परंतु आता शेतकऱ्यांची हीच समस्या सरकारने लक्षात घेतली आहे. आणि त्यांच्यासाठी एक नवीन योजना सुरू केली आहे. सरकारच्या या नवीन योजनेचे आहे नाव आहे बीज ग्राम योजना. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना अगदी कमी किमतीमध्ये चांगल्या प्रतीचे बियाणे सरकारकडून दिले जाईल. तर आता आपण या योजनेबद्दल सविस्तर माहिती घेऊया.

बीज ग्राम योजना म्हणजे काय?

ही योजना केंद्र सरकारने चालवलेली आहे ही योजना शेतकऱ्यांसाठी सुरू करण्यात आलेली आहे. 2014 ते 15 मध्ये ही योजना सुरू करण्यात आलेली आहे. सरकारच्या या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना पेरणी कापणी आणि इतर सगळ्या कामांचे देखील प्रशिक्षण दिले जाते. जेणेकरून शेतकऱ्यांना त्यांच्या शेतीमध्ये चांगल्या प्रकारे आर्थिक नफा मिळवता येईल. बियाण्यांचा जो काही बाजार चाललेला आहे तो दूर करण्यासाठी सरकारने ही योजना सुरू केलेली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना योग्य प्रतीचे बियाणे मिळते आणि त्यांना आर्थिक लाभ होतो.

या योजनेचा लाभ काय आहे ?Beej Graam Yojana

  • या योजनेचा सगळ्यात पहिला लाभ म्हणजे शेतकऱ्यांना चांगल्या बियाणांसाठी इतरत्र कोणत्याही दुकानात फिरावे लागत नाही.
  • त्याचप्रमाणे या बियाणांमुळे त्यांचे चांगले उत्पादन होते आणि त्यांना चांगला आर्थिक नफा देखील वाढतो.
  • त्याचप्रमाणे शेतकऱ्यांना कृषी तज्ञांकडून प्रशिक्षण.
  • शेतकऱ्यांना नवीन तंत्रज्ञानाची देखील सरकारकडून माहिती मिळते.
  • जे शेतकरी आर्थिकरित्या दुर्बल आहेत त्या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मोठ्या प्रमाणात होणार आहे