Beneficial Crops In Summer | उन्हाळ्यात ‘ही’ पिके घेतल्याने शेतकरी होतील मालामाल, वाचा सविस्तर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Beneficial Crops In Summer | आपला भारत हा एक शेतीप्रधान देश आहे. आपल्या देशातील जवळपास 75 टक्के लोकसंख्या ही शेती या व्यवसायावर अवलंबून आहे. शेतकरी हे प्रत्येक ऋतूनुसार शेतात वेगवेगळे पिके घेत असतात. कारण प्रत्येक ऋतूनुसार भाजीला वेगळे महत्त्व असते. त्याचे बाजारात भाव वाढतात त्यामुळे प्रत्येक ऋतूनुसार शेतकरी वेगवेगळे भाज्या फळभाज्या घेत असतात.

आत्ता उन्हाळा ऋतू चालू झाला आहे. उन्हाची झळ देखील मोठ्या प्रमाणात बसत आहे. त्यामुळे आता उन्हाळ्यात शेतकऱ्यांनी कोणती पिके घ्यायला पाहिजे याची माहिती आपण पाहणार आहोत. आज आपण शेतकऱ्यांनी उन्हाळ्यात घेतल्या जाणारी काही अशी पिके बघणार आहोत, ज्याची लागवड करताना त्यांना कमी खर्च होईल परंतु त्यातून जास्त उत्पादन मिळेल. शेतकऱ्यांनी उन्हाळ्यात केली तर ते चांगलेच मालामाल होतील . तर जाणून घेऊया ती पिके कोणती आहेत.

मिरची

हिरव्या मिरचीला बाजारात नेहमीच मागणी असते आणि चांगला भाव देखील असतो. त्यामुळे मिरचीची लागवड आपण कोणत्याही सीजनमध्ये करू शकतो. परंतु उन्हाळ्यामध्ये मिरचीला जास्त मागणी वाटते. त्याचप्रमाणे मिरचीही कमी पाण्यात देखील चांगल्या प्रकारे उत्पन्न देऊ शकते. त्यामुळे उन्हाळ्यात मिरचीची लागवड केली तर शेतकऱ्यांना नक्कीच त्याचा फायदा होईल.

गवार | Beneficial Crops In Summer

गवारीची भाजी साधारण सगळ्यांनाच आवडते. त्याचप्रमाणे बाजारात देखील गवारीला चांगली मागणी असते. उन्हाळ्यात देखील गवारीचे पीक खूप चांगल्या प्रकारे येतो. त्याचप्रमाणे गवारीचे पीक घेण्यासाठी कष्ट देखील कमी आहेत. आणि त्याला कमी पैसे लागतात. त्यामुळे उन्हाळ्यात जर शेतकऱ्यांनी गवारीचे पीक घेतले तर त्यांना चांगला फायदा होईल.

वांगी

वांगी ही अत्यंत कमी पाण्यावर येणारी भाजी आहे. उन्हाळ्यामध्ये अनेकदा पिकांना जास्त प्रमाणात पाणी मिळत नाही. कारण या दिवसांमध्ये खूप जास्त प्रमाणात हिट वाढलेली असते. परंतु बाजारामध्ये वांग्याला चांगली मागणी असते. त्यामुळे जर उन्हाळ्यामध्ये वांगी केली तर शेतकऱ्यांना चांगला फायदा होईल.

काकडी

उन्हाळ्यामध्ये काकडी ही एक हायड्रेटेड फूड आहे. उन्हाळा जास्त वाढतो. त्यामुळे काकडीला देखील बाजारात मोठ्या प्रमाणात मागणी वाढते. त्यामुळे उन्हाळ्यात जर शेतकऱ्यांनी काकडी लावली. तर त्यांना त्याचा चांगलाच फायदा होईल काकडीला जास्त कष्ट देखील यावे लागत नाही. त्याचप्रमाणे आठवड्यातून एकदा तोडणी होते. त्यामुळे तर आठवड्याला ते बाजारात काकडीला घेऊन जाऊ शकतात.

भेंडी

लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत सगळ्यांनाच मोठ्या प्रमाणात आवडते. त्याचप्रमाणे भेंडीला उन्हाळ्यात चांगली मागणी असते. शेतकऱ्यांनी जर उन्हाळ्यात भेंडीचे पीक घेतले तर त्यांना नक्कीच त्याचा खूप फायदा होईल.

टोमॅटो

अनेक भागांमध्ये उन्हाळ्यात टोमॅटो हे प्रमुख पीक असते. अनेक बागायतदार हे प्रामुख्याने उन्हाळ्यात टोमॅटो या पिकाचे उत्पादन होतात. त्याचप्रमाणे टोमॅटोला सुद्धा चांगला भाव आहे त्यामुळे या उन्हाळ्याच्या शेतकऱ्यांनी टोमॅटोचे पीक घेतले, तर त्यांना नक्कीच मोठा आर्थिक फायदा होईल.