Benefits Of Curry Leaves Water | भारतीय जेवणामध्ये कढीपत्ता मोठ्या प्रमाणात वापरला जातो. जवळपास सगळ्या भाज्यांमध्ये कढीपत्त्याचा वापर करतात. कढीपत्त्यामुळे जेवणाची चव वाढते. त्याचबरोबर कढीपत्त्यामध्ये अनेक औषधी गुणधर्म असतात. तुम्ही जर कडीपत्त्याच्या पानांचे पाणी करून त्याचे सेवन केले, तर त्यामुळे तुमचे शारीरिक आरोग्य खूप सुधारते. त्यात मुबलक प्रमाणात अँटिऑक्सिडंट, जीवनसत्वे आणि खनिजे असतात. जी रोगांची लढण्यासाठी मदत करतात. आणि शरीराला देखील त्याचा खूप फायदा होतो.
कढीपत्त्याच्या सेवनाने तुमची पचनक्रिया देखील सुधारते. त्याचप्रमाणे मधुमेहावर नियंत्रण राहते आणि तुमची त्वचाही एकदम निरोगी राहते. यासोबत मानसिक ताण देखील कमी होतो. आणि शारीरिक ऊर्जा वाढते. हे पाणी जर तुम्ही रोज पिले, तर त्यामुळे तुमच्या शरीराला खूप फायदा होतात. आता आपण या कढीपत्त्याचे पाणी रोज पिले, तर काय फायदे होतात (Benefits Of Curry Leaves Water ) हे जाणून घेणार आहोत.
ॲनिमियाचा धोका कमी होतो | Benefits Of Curry Leaves Water
कढीपत्त्यात मुबलक प्रमाणात लोह असते, जे लाल रक्तपेशी तयार करण्यास मदत करते. त्यामुळे कढीपत्त्याचे पाणी प्यायल्याने हिमोग्लोबिनची पातळी योग्य प्रमाणात राहते, ज्यामुळे ॲनिमियाचा धोका कमी होतो.
केसांचे आरोग्य राखते
कढीपत्त्याच्या पाण्यात बीटा कॅरोटीन आणि लोहासारखे पोषक घटक असतात, जे केसांच्या आरोग्यासाठी फायदेशीर असतात. हे केस मजबूत, चमकदार आणि निरोगी ठेवण्यासाठी उपयुक्त आहेत.
वजन कमी होणे
कढीपत्त्याच्या पाण्यात असलेले बायोएक्टिव्ह कंपाऊंड आणि अँटी-ऑक्सिडंट भूक कमी करतात आणि तृप्ततेची भावना निर्माण करतात, ज्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते.
श्वसनाच्या समस्या कमी होतात
कढीपत्त्याच्या पाण्यात असलेले अँटी-ऑक्सिडंट्स आणि व्हिटॅमिन सी श्वसनसंस्था निरोगी ठेवण्यास मदत करतात. अशा प्रकारे ते श्वसन रोगांचा धोका कमी करते.
दृष्टी | Benefits Of Curry Leaves Water
कढीपत्त्याच्या पाण्यात असलेले व्हिटॅमिन ए आणि अँटी-ऑक्सिडंट्स डोळ्यांचे आरोग्य सुधारतात आणि दृष्टी चांगली ठेवतात. यामुळे डोळ्यांच्या कमकुवतपणाचा त्रास होत नाही.
कढीपत्त्याचे पाणी कसे बनवायचे?
ते तयार करणे खूप सोपे आहे. ४-५ कढीपत्त्यांची देठं धुवून घ्या आणि एका कढईत एक ग्लास पाणी टाका आणि त्यात कढीपत्त्याची देठं घालून काही वेळ उकळा आणि नंतर गाळून घ्या आणि थोडं थंड करून प्या.