थंडीत आईस्क्रीम खाताय? जाणून घ्या शरीरासाठी ‘हे’ आहेत उत्तम फायदे

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । असा एक पदार्थ आहे कि तो कोणत्याही ऋतूत खाल्ला जातो तो म्हणजे आईस्क्रीम होय. हा पदार्थ कुणाला नाही आवडत? तर तो सर्वांना अगदी लहान मुलांपासून ते थोर मंडळींपर्यंत आईस्क्रीम आवडीने खाल्ले जाते. मात्र, थंडीत आईस्क्रीम न खाण्याचा सल्ला दिला जातो. पण, थंडीतही आईस्क्रीम खाणं आपल्या शरीरासाठी फायदेशीर ठरते. चला तर मग जाणून घेऊया त्याचे फायदे…

प्रत्येकाला आइस्क्रीम खूप आवडते. आइस्क्रीमचा एक चमचा काही आरोग्य फायदे देऊ शकतो. यामध्ये व्हिटॅमिन बी 12, बी 6, डी, सी आणि ई सारखी जीवनसत्त्वे असतात. हे चरबी, प्रथिने आणि कार्बोहायड्रेट्सचा एक उत्कृष्ट स्त्रोत आहे ज्याने शरीराला ऊर्जा मिळते.

आईस्क्रीम हे गोठलेले अन्न आहे जे मुख्यतः गोड मिष्टान्न म्हणून वापरले जाते. क्रीम आणि दूध किंवा फळे आणि फ्लेवरिंग एजंट्स वापरून अशा मिश्रणाने ते तयार केले जाते. आईस्क्रीम गोड करण्यासाठी साखर किंवा कृत्रिम स्वीटनर्सचा वापर केला जातो. रंग, चव आणि स्टॅबिलायझर्स देखील वापरले जातात.

‘हे’ आहेत फायदे –

1) शरीरातील उष्णता वाढवण्याचे काम

ice cream

आरोग्य तज्ज्ञांच्या मते, आइस्क्रीम खाण्यास थंड असले तरी त्याचा प्रभाव गरम असतो. आइस्क्रीममध्ये फॅटचे प्रमाण जास्त असते, जे शरीरातील उष्णता वाढवण्याचं काम करते.

2) आईस्क्रीम घसादुखीसाठी चांगले

ice cream balls

आईस्क्रीम खाल्याने घसादुखीपासून आराम मिळतो. घसा खवखवत असल्यास तुम्ही तत्काळ आईस्क्रीम खाल्ल्यास तुम्हाला घसादुखीपासून आराम मिळेल.

3) तणाव दूर करण्यास उपयुक्त

Ice Cream 02

एका सर्वेक्षणात असे आढळून आले आहे की, आईस्क्रीम खाल्ल्याने मनावरचा तणाव कमी होतो. जर तुम्ही दिवसभराच्या कामाने मानसिकदृष्ट्या थकले असाल तर तुम्ही आइस्क्रीम घाल्यावर तुमचा ताणतवाण नाहीसा होतो. तणाव दूर करण्यासाठी आईस्क्रीम एक उत्तम उपाय आहे.

4) जास्त प्रथिनांचा पुरवठा

Ice Cream 03

आईस्क्रीम दुधापासून बनते आणि दुधात प्रथिने आढळतात. प्रथिने आपल्या शरीरातील स्नायू, त्वचा, हाडांसाठी फायदेशीर असतात. त्यामुळे हिवाळ्यातही आईस्क्रीम खाल्ल्याने शरीराला आवश्यक प्रथिने मिळून फायदा होतो.

5) अनेक प्रकारचे जीवनसत्व

chocolate kulfi

आईस्क्रीममध्ये व्हिटॅमिन ए, बी2 आणि बी12 भरपूर प्रमाणात आढळतात. व्हिटॅमिन ए आपले डोळे, त्वचा, हाडे आणि रोगप्रतिकारशक्ती चांगली राखते. आईस्क्रिममध्ये ही सर्व जीवनसत्त्वे म्हणजे व्हिटॅमिन्स असतात. त्यामुळे शरीरातील जीवनसत्वही वाढते.

6) ओमेगा 3

cream ice cream

आईस्क्रीममध्ये व्हिटॅमिन डी आणि ओमेगा 3 ही भरपूर प्रमाणात असतात. ओमेगा 3 मेंदू, त्वचा आणि केसांसाठी फायदेशीर आहे तर व्हिटॅमिन डी शरीराच्या हाडांसाठी महत्त्वपूर्ण आहे.