व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

शिळी चपाती टाकून देताय? त्याआधी ‘हे’ फायदे वाचाच

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | मित्रानो, आपल्या घरात जेवण जास्त प्रमाणात बनवलं गेलं तर ते तसेच राहते आणि मग ते अन्न खराब होऊन नये म्हणून आपण नंतर किंवा दुसऱ्या दिवशी ते शीळे अन्न खातो. तुम्हीही असे अनेकदा केलं असेल. खास करून शिळी चपाती आपण अनेकदा खाल्ली असेल. पण शिळी चपाती खाणे आपल्या आरोग्यासाठी योग्य आहे कि नाही याचा विचार तुम्ही कधी केला आहे का? चला तर आज आपण जाणून घेऊया

मित्रानो, आपल्या घरात नेहमीच प्रमाणापेक्षा जास्त चपात्या केलेल्या असतात . त्या कधी वेळेत संपवल्या जातात तर कधी त्या शिळ्या होतात. मात्र ह्या शिळ्या चपात्या आरोग्याच्या दृष्टीने फायदेशीर आहेत. याचे कारण म्हणजे भारतात गव्हाचे पीठ आणि पाणी वापरून चपाती बनवली जाते. आणि ते बनवल्यानंतर, ते कोणत्याही प्रकारचा ओलावा टिकवून ठेवत नाही, म्हणून त्याचे शेल्फ लाइफ जास्त असते. चपात्या बनवल्यानंतर 12- 15 तास खाण्यासाठी योग्य मानल्या जातात.

शिळी चपाती खाण्याचे काही मुख्य फायदे –

१) शिळ्या चपात्या मधुमेहाच्या रुग्णांसाठी उत्तम आहेत. दुधासोबत शिळ्या चपात्या खाल्ल्याने रक्तातील साखरेचे प्रमाण कमी होते. त्यासाठी चपाती खाण्यापूर्वी पाच ते सात मिनिटे दुधात भिजवून ठेवाव्यात असे सांगितले जाते.

२) गॅस, बद्धकोष्ठता, पित्त, यासह इतर पोटाच्या निगडीत असणारा त्रास शिळी चपाती खाल्ल्याने कमी होऊ शकतो. यासाठी सकाळी दुधासोबत शिळी चपाती खा.

३) जर तुम्हाला ताप येत असेल तर शिळ्या चपात्या थंड दुधात भिजवाव्यात, कारण त्यामुळे शरीराचे तापमान नियंत्रित राहते. दुधाचे अतिरिक्त पोषण तुमची अस्वस्थता कमी करण्यात मदत करेल.

४) ताज्या चपातीच्या तुलनेत शिळ्या चपातीमध्ये कॅलरीचे प्रमाणही कमी असते. त्यामुळे वजन वाढण्याचा धोका राहात नाही.

५) शिळ्या चपातीमध्ये फायबरचा अधिक स्रोत मिळतो. फायबर हे नेहमीच पोटातील भूक शमविण्यासाठी उत्तम ठरते