चांगल्या आरोग्यासाठी खावे विड्याचं पान; मिळतील अनेक आश्चर्यकारक फायदे

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| धार्मिक विधी करताना विड्याच्या पानाला (vidyach Pan) महत्त्वाचे स्थान दिले जाते. परंतु हेच विड्याचे पान आपल्या शरीरासाठी देखील तितकेच फायदेशीर ठरते. जर तुम्हाला पोटा संबंधित आजार असतील तर विड्याचे पान त्यावर रामबाण उपाय ठरेल. तसेच खोकला आल्यानंतर, सूज आल्यास विड्याचे पान खाणे फायदेशीर ठरेल. तुम्हाला जर विड्याचे पान खाण्याचे हे सर्व फायदे माहितच नसतील तर हा लेख नक्की वाचा.

पान खाण्याचे फायदे

  • विड्याच्या पानांमध्ये विटामिन सी, विटामिन ए, लोह, कॅल्शियमसारखे अनेक पोषक गुणधर्म आढळतात. त्यामुळे विड्याचे पान खाणे शरीरासाठी अत्यंत फायदेशीर ठरते.
  • पोटाचे काही विकार असल्यास तुम्ही विड्याचे पान खाऊ शकता. तसेच फूड पॉईंट झाल्यानंतर देखील विड्याचे पान खाल्ल्यास आराम मिळू शकतो.
  • विड्याच्या पानात अँटीऑक्सिडंटसचे प्रमाण जास्त असल्यामुळे बद्धकोष्ठतेसारख्या समस्यांवर हे पान खाणे फायदेशीर ठरते.
  • विड्याच्या पानात अँटीबॅक्टेरियल असे गुणधर्मही असतात. यामुळे हे पान खाल्ल्यास तोंडाची दुर्गंधी कमी होत जाते. सोबत तोंडातील बॅक्टेरियांचा नाश होतो.
  • तसेच सूज आलेल्या ठिकाणी किंवा पाय मुरगळल्यास तेथे विड्याचे पान गरम करून बांधल्यास सर्व वेदना दूर होतात.
  • सर्दी झाल्यास विड्याच्या पानांमध्ये लवंग टाकून ते खावे. यामुळे सर्दी बरी होते. आणि कप देखील बाहेर पडतात.
  • तोंड आल्यानंतर विड्याच्या पानाला तूप लावून ते खाल्ल्यास तोंड, जर बरा होतो.