Benefits Of Jamun | उन्हाळा सुरू झालेला आहे. उन्हाळ्यामध्ये अनेक प्रकारची फळे बाजारात विकायला येतात. यापैकी जांभूळ हे एक असे फळ आहे, जे अनेकांना आवडते. हे फळ चवीला देखील खूप चांगले लागते. त्याबरोबर आरोग्यासाठी देखील हे खूप फायदेशीर आहे. मधुमेहाच्या रुग्णांसाठी अनेक डॉक्टर जांभूळ खाण्याचा सल्ला देतात. कारण यामध्ये अनेक गुणधर्म असतात. आयुर्वेदिक उपचारांमध्ये देखील जांभळाला खूप महत्त्व आहे. आपल्या आरोग्यासाठी जांभूळ खूप महत्त्वाचे आहे. आता आपण जांभळाचे (Benefits Of Jamun) आपल्या आरोग्याला काय काय फायदे होतात? हे जाणून घेणार आहोत.
मधुमेहासाठी फायदेशीर | Benefits Of Jamun
आयुर्वेदात मधुमेहासाठी जांभूळ खायला सांगतात. कारण या फळाच्या बियांमध्ये अनेक पोषक घटक असतात. ज्यामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण कमी होते आणि इन्सुलिनची पातळी वाढते. त्याचप्रमाणे हे स्टार्चचे ऊर्जेमध्ये रूपांतर करते. आणि वारंवार लघवी होणे यांसारखी मधुमेहाची लक्षणे कमी करते.
निरोगी हृदय
जांभळामध्ये मोठ्या प्रमाणात पोटॅशियम असते. त्यामुळे हृदयासंबंधीत आजार दूर ठेवण्यासाठी जांभूळ खूप फायदेशीर आहे. जांभळाचे नियमितपणे सेवन केल्याने रक्तवाहिन्या कडक होण्यास प्रतिबंध होतो. उच्च रक्तदाबाचे बीपीचे लक्षणे कमी करण्यासाठी त्याचप्रमाणे उच्च रक्तदाब नियंत्रित करण्यासाठी जांभूळ खाल्ले जाते.
वजन कमी करण्यासाठी फायदेशीर | Benefits Of Jamun
जांभळामध्ये कमी कॅलरीज आणि फायबर जास्त असते. त्यामुळे वजन कमी करण्यासाठी जांभूळ हा एक उत्तम पर्याय असते. वजन कमी करण्यासोबत जांभळामध्ये पचन सुधारते आणि चयापचय वाढते. त्यामुळे जांभूळ खाणे वजन कमी करण्यासाठी देखील खूप फायदेशीर आहे.
दातांसाठी उपयुक्त
जांभळाच्या वाळलेल्या पानांमध्ये बॅक्टेरिया विरोधी गुणधर्म असतात. त्यामुळे ते आपले दात आणि हिरड्या मजबूत करतात. त्यामुळे तुम्ही जांभळाच्या पावडरचा टूथ पावडर म्हणून देखील वापर करू शकता. या जांभळाच्या पानांमध्ये तुरट गुणधर्म असतात. त्यामुळे घशाच्या समस्यावरही प्रभावी उपाय करता येतो. त्याचप्रमाणे श्वासाची दुर्गंधी कमी होते. तोंडात व्रण किंवा हिरड्यांना आलेली सूज कमी करण्यासाठी देखील जांभळाचा वापर करतात.
चमकदार त्वचा
तुम्ही जर जांभळ्याचा रस नियमित केला तर तुमची त्वचा देखील चमकते आणि निरोगी राहते. त्यामुळे हे आपल्या रक्त डिटॉक्सिफाय करते. तसेच शुद्ध करते. त्यामुळे तुमची त्वचा आतून चमकते. जांभळामध्ये विटामिन सी मुबलक प्रमाणात असते. त्यामुळे तुमच्या चेहऱ्यावर असलेले पिंपल्स आणि डाग देखील दूर होतात.