Sunday, March 26, 2023

Post Office ची फायदेशीर योजना; फक्त 5 वर्षांच्या गुंतवणुकीनंतर मिळेल 14 लाखांचा फंड

- Advertisement -

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्याच्या महागाईच्या आणि बेरोजगारीच्या काळात पैशाची बचत आणि योग्य गुंतवणूक करणे प्रत्येकाची आवश्यकता बनली आहे . जर तुम्ही सुद्धा सुरक्षित गुंतवणुकीचा विचार करत असाल तर आम्ही तुम्हाला पोस्ट ऑफिसची एक योजना सांगणार आहोत ज्यामध्ये तुम्ही फक्त 5 वर्षात 14 लाख रुपयांचा फॅट फंड बनवू शकता. ही योजना म्हणजे पोस्ट ऑफिस सीनियर सिटिझन्स सेव्हिंग स्कीम.. SCSS मध्ये खाते उघडण्यासाठी वय ६० वर्षे असावे. या योजनेत फक्त 60 वर्षे किंवा त्याहून अधिक वयाचे लोक खाते उघडू शकतात.

जर तुम्ही रिटायर झाला असाल आणि तुम्ही कमावलेल्या पैशाची योग्य गुंतवणूक करण्याच्या विचारात असाल तर जर तुम्ही ज्येष्ठ नागरिक योजनेत 10 लाख रुपयांची एकरकमी गुंतवणूक करून 5 वर्षांनंतर 14 लाख रुपयांपेक्षा अधिक रक्कम मिळवू शकता. म्हणजे 5 वर्षांनंतर वार्षिक 7.4 टक्के (चक्रवाढ) व्याजदराने, म्हणजे मॅच्युरीटी वर, गुंतवणूकदारांना एकूण रक्कम 14,28,964 रुपये होईल. याचा अर्थ येथे तुम्हाला व्याजाच्या स्वरूपात 4,28,964 रुपयांचा लाभ मिळत आहे.

- Advertisement -

या योजनेत खाते उघडण्यासाठी किमान रक्कम 1000 रुपये आहे. याशिवाय तुम्ही या खात्यात 15 लाखांपेक्षा जास्त रक्कम ठेवू शकत नाही. तसेच जर तुमचे खाते उघडण्याची रक्कम एक लाख रुपयांपेक्षा कमी असेल तर तुम्ही रोख पैसे देऊनही खाते उघडू शकता. तर, एक लाख रुपयांपेक्षा जास्त खाते उघडण्यासाठी तुम्हाला एक चेक द्यावा लागेल.