Benefits Of Watermelon to SKin | उन्हाळ्यात त्वचेच्या सुरक्षेसाठी ‘हे’ फळ आहे वरदान, जाणून घ्या फायदे आणि वापरण्याची पद्धत

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Benefits Of Watermelon to SKin | उन्हाळ्याला सुरुवात झालेली आहे. उन्हाचा तडाका देखील दिवसेंदिवस वाढत चाललेला आहे. अगदी घरात बसून देखील खूप जास्त उष्णता जाणवत आहे. उन्हाळ्यामध्ये स्वतःला हायड्रेट ठेवून स्वतःच्या शरीराची काळजी घेणं खूप गरजेचे असते. अन्यथा आपल्याला अनेक आजारांना सामोरे जावे लागते. या उन्हाळ्यात आपल्याला हंगामी फळे खाणे खूप गरजेचे असते. त्यामुळेच आपल्या शरीरातील पाण्याची पातळी टिकून राहते. उन्हाळ्यामध्ये सगळ्यात जास्त कलिंगड (Benefits Of Watermelon to SKin) मोठ्या प्रमाणात खाल्ले जाते. त्याला उन्हाळी सुपर फूड असे देखील म्हटले जाते. कारण या कलिंगडामध्ये पुरेशा प्रमाणात पाणी असते. जे तुमच्या शरीरासाठी देखील खूप उत्तम असते. त्याचप्रमाणे उन्हाळ्यात तुमच्या त्वचेची काळजी घेण्यासाठी देखील कलिंगड खूप फायदेशीर ठरते. उष्णता वाढल्यामुळे तुमच्या चेहऱ्यावर पुरळ येतात त्याचप्रमाणे त्वचा कोरडी पडते. परंतु उन्हाळ्यात त्वचेच्या समस्यांवर देखील कलिंगड खूप प्रभावीपणे काम करते. आता आपण त्वचेसाठी कलिंगडाचा काय फायदा होतो हे जाणून घेणार आहोत.

त्वचेसाठी कलिंगडाचे फायदे

त्वचा हायड्रेट राहते

उन्हाळ्यामध्ये आपल्या शरीरातील पाण्याची पातळी कमी होते. त्यामुळे आपल्या त्वचेला पुरेशा प्रमाणात हायड्रेशन मिळत नाही. परंतु जर आपण उन्हाळ्यामध्ये दररोज कलिंगडाचे सेवन केले, तर आपल्या त्वचेला हायड्रेशन आणि पोषण देखील मिळते. त्याचप्रमाणे हे कलिंगड तुम्ही तुमच्या त्वचेवर देखील लावू शकता.

त्वचेचा टोन सामान्य ठेवते | Benefits Of Watermelon to SKin

कलिंगडामध्ये जास्त प्रमाणात एंटीऑक्सीडेंट आणि जीवनसत्वे असतात. जे तुम्हाला खूप चांगल्या प्रकारे पोषण देतात आणि तुमचा त्वचेचा टोन सुधारण्यासाठी देखील मदत करतात.

त्वचा चमकदार बनवते

कलिंगडामध्ये विटामिन सी देखील पुरेशा प्रमाणात आढळते. त्यामुळे तुमचा रंग उजळतो आणि त्वचा देखील चांगली राहते.

वृद्धत्वाची प्रक्रिया बंद होते

कलिंगडामध्ये जास्त प्रमाणात जीवनसत्वे आणि अँटिऑक्सिडंट असतात. जे कोलोजन उत्पादनासाठी उपयुक्त असतात. चेहऱ्यावर येणाऱ्या अत्यंत बारीक रेषा तसेच सुरकुत्या वेळोवेळी दिसण्यापासून कलिंगड रोखते. त्यामुळे तुम्ही जास्तच जास्त तरुण दिसत आणि तुमची त्वचा देखील चमकदार बनते.

त्वचेसाठी फेशियल क्लीनर

हे कलिंगड तुमच्या त्वचेसाठी खूप फायदेशीर असते. त्याचा तुम्हाला खूप मोठ्या प्रमाणात फायदा होतो. तुमच्या चेहऱ्यावर असणारे छिद्र उघडण्यास मदत करते. त्याचप्रमाणे तुमचे त्वचेतील मृत पेशी देखील काढून टाकतात. त्वचेवरील धूळ आणि प्रदूषण देखील कलिंगडामुळे कमी होते. ज्यामुळे तुमची त्वचा अत्यंत मऊ आणि कोमल दिसते.

मॉइश्चराईज आणि हायड्रेट त्वचा

कलिंगडामध्ये जास्त प्रमाणात विटामिन ए असते. ज्याचा वापर तुमची त्वचा तेलकट न होण्यासाठी होते. तुमची त्वचा नेहमीच मॉइश्चराईज आणि हायड्रेट राहते.

कलिंगड त्वचेवर वापरण्याची योग्य पद्धत | Benefits Of Watermelon to SKin

कलिंगड आणि मध फेस मास्क

यामध्ये दोन चमचे मॅश केलेले कलिंगड एक चमचा मधामध्ये मिसळ आणि चेहऱ्यावर लावा. 15 मिनिटे तसेच राहू द्या. त्यानंतर पाण्याने चेहरा स्वच्छ धुवा. त्यामुळे तुमच्या त्वचेला उजळ करण्यास देखील खूप मदत करतो.

काकडी आणि कलिंगडापासून फेस मास्क

एका भांड्यात कलिंगडाचे दोन छोटे तुकडे मॅश करा. एक चमचा मुलतानी माती घ्या त्यात एक चमचा काकडीचा रस मिसळून चांगलीं पेस्ट तयार करून घ्या. आणि चेहऱ्यावर लावून 10 ते 15 मिनिटे तसेच राहू द्या आणि नंतर थंड पाण्याने तुमचा चेहरा धुवा.

कलिंगडाचा स्प्रे

तुमची त्वचा ताची आणि हायड्रेट ठेवण्यासाठी एका स्प्रे बॉटलमध्ये कलिंगडाचा रस तयार करा आणि गुलाब पाणी भरा आणि दिवसभर चेहऱ्यावर स्प्रे करा. त्यामुळे तुमची त्वचा हायड्रेट राहील.

डोळ्यांना शांत करण्यासाठी

डोळ्यांची सूज कमी करण्यासाठी त्याचप्रमाणे शांत करण्यासाठी कलिंगडाचे दोन तुकडे घ्या आणि दहा ते पंधरा मिनिटे डोळ्यांवर ठेवा. त्यामुळे तुमच्या डोळ्यांना आराम मिळेल.