2024 मध्ये अधिक नफा मिळवून देणारे स्टार्टअप्स व्यवसाय

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारतात सध्याच्या काळात स्टार्टअप व्यवसायांना मोठ्या प्रमाणात चालना मिळाली आहे. या स्टार्टअप व्यवसायासाठी सरकारकडून विविध योजना, निधी आणि मार्गदर्शन उपक्रम राबवून त्यांना प्रोत्साहन देत आहे. प्रत्येकजण या व्यवसायाच्या माध्यमातून अधिक नफा कमावण्याचे उद्दिष्ट डोळयासमोर धरत असते. त्यामुळे आज आपण 2024 या वर्षात जास्त फायदा मिळवून देणाऱ्या स्टार्टअप व्यवसायाची माहिती पाहणार आहोत . तर चला त्याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात.

विवाह नियोजन व्यवसाय

जर तुम्हाला एखाद्या कार्यक्रमाचे प्लॅनिंग करायला आवडत असेल , तर तुम्ही विवाह नियोजन व्यवसाय सुरु करू शकतात. या व्यवसायातून जास्त फायदा मिळू शकतो . भारतीय लग्न सोहळे खूप भव्य आणि तितकेच गुंतागुंतीचे असतात. त्यामुळे तुम्ही योग्य नियोजन आखून व्यवसाय सुरु केल्यास या क्षेत्रात उंचीवर पोहचाल .

ऑनलाइन किराणा व्यवसाय

डिजिटल तंत्रज्ञानाच्या वाढत्या प्रभावामुळे किराणा वस्तू घरपोच करण्याचा व्यवसाय भरभराटीला आला आहे. केवळ 30000 ते 40000 रुपयाच्या गुंतवणुकीत हा व्यवसाय सुरू करता येतो. 2029 पर्यंत हा बाजार 73.89 अब्ज रुपयांपर्यंत पोहोचण्याचा अंदाज आहे.

लोणच्यांचा व्यवसाय

भारतीय घरांमध्ये लोणच्यांना विशेष स्थान आहे. 25000 ते 30000 रुपयाच्या सुरुवातीच्या गुंतवणुकीत हा व्यवसाय सहज घरातून सुरू करता येतो. हा व्यवसाय दीर्घकालीन यशाचे आश्वासन देतो. त्यामुळे या व्यवसायाला 2024 मध्ये चांगला प्रतिसाद मिळाला आहे.

ड्रॉपशिपिंग व्यवसाय

ड्रॉपशिपिंग हे ई-कॉमर्समधील आकर्षक मॉडेल आहे. 20000 ते 50000 गुंतवणुकीत हा व्यवसाय सुरू करता येतो. योग्य वस्तूंची निवड आणि प्रभावी मार्केटिंग केल्यास महिना 20000 ते 100000 कमावता येतात.

हस्तनिर्मित कपडे तसेच अ‍ॅक्सेसरीज

तुमच्याकडे जर डिझायनिंगचे कौशल्य असेल , तर तुम्ही 50000 पेक्षा कमी गुंतवणुकीत हा व्यवसाय सुरू करू शकता . पर्यावरणपूरक उत्पादनांसाठी ग्राहकांचा वाढता कल याला फायदा देतो.

पाळीव प्राण्यांची काळजी सेवा

आता प्राणी पाळणाऱ्यांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्यामुळे पाळीव प्राण्यांचे मालक त्यांच्या पाळीव प्राण्यांसाठी चांगल्या सेवा मिळविण्यासाठी नेहमीच तत्पर असतात. अशा प्राण्यांसाठी तुम्ही पेट शॉप ओपन करू शकता. 30000 ते 50000 च्या गुंतवणुकीत पाळीव प्राण्यांच्या काळजी सेवेमध्ये चांगला नफा मिळवता येतो. 2024 या व्यवसायात चांगला फायदा झालेला दिसून येत आहे.

डिजिटल मार्केटिंग सेवा

प्रत्येक व्यवसायाला प्रभावी डिजिटल उपस्थितीची गरज असते. 20000 ते 40000 च्या गुंतवणुकीत हा व्यवसाय सुरू करता येतो. चांगल्या ग्राहकांसह महिना 50000 ते 150000 पर्यंत कमाई करता येऊ शकते.

ऑनलाइन ट्युशन

2024 मध्ये ऑनलाइन ट्युशन व्यवसायाला भरमसाठ प्रतिसाद मिळालेला आहे. विद्यार्थ्यांच्या गरजा जाणून घेऊन तुम्ही घरून देखील हा व्यवसाय सुरु करू शकता. यासाठी 50000 पेक्षा कमी गुंतवणुकीत ऑनलाइन शिक्षण व्यवसाय सुरू करता येतो. वरील व्यवसायानी 2024 मध्ये कमी गुंतवणुकीत चांगला नफा मिळवून दिला आहे. योग्य नियोजन, कौशल्य आणि सातत्याने मेहनत घेतल्यास यश नक्कीच तुमच्यापर्यंत पोहोचेल.