हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Credit Card : जर आपण नवीन वर्षात परदेशात सुट्टीसाठी जाणार असाल अथवा व्यवसायाच्या संदर्भात अनेकदा परदेशात प्रवास करत असाल तर आपल्याला या क्रेडिट कार्डांबाबत माहिती असायलाच हवी. कारण या क्रेडिट कार्ड्स द्वारे आंतरराष्ट्रीय प्रवासादरम्यान फ्लाइट आणि हॉटेलच्या बुकिंगवर मोठी सवलत दिली जाते. इतकेच नाही तर त्यांच्या मदतीने आपल्याला फॉरेक्स मार्क-अप शुल्कात मोठी बचतही करता येते. तर आज आपण आंतरराष्ट्रीय प्रवासासाठी सर्वोत्तम मानल्या जाणाऱ्या काही क्रेडिट कार्डांबाबतची माहिती जाणून घेणार आहोत.
HDFC Diners Club Privilege Credit Card : या क्रेडिट कार्डवर 2 टक्के फॉरेक्स मार्क-अप शुल्क लागते. तसेच यामध्ये एका वर्षात जगभरात 12 एअरपोर्ट लाउंजला भेट देता येतात. याबरोबरच SmartBuy द्वारे फ्लाइट किंवा हॉटेल बुकिंगसाठी रिवॉर्ड पॉईंट्स रिडीम करता येतील. या क्रेडिट कार्डवर 2,500 रुपये वार्षिक शुल्क द्यावे लागेल.
RBL World Safari Credit Card : या क्रेडिट कार्डवर फॉरेक्स मार्कअप शुल्कासाठी कोणतेही शुल्क आकारले जात नाही. तसेच या कार्डद्वारे 3,000 रुपये किंमतीचे MakeMyTrip वेलकम व्हाउचर ऑफर केले जाते. त्याच बरोबर या कार्डद्वारे युझर्सना आंतरराष्ट्रीय एअरपोर्ट लाउंजमध्ये प्रवेश करण्यासाठी प्राइमरी पास मेंबरशिप मिळते. त्याचबरोबर ही बँक एका वर्षात 2.5 लाख रुपये खर्च केल्यास 10,000 ट्रॅव्हल पॉइंट आणि 1 वर्षात 5 लाख रुपये खर्च केल्यास अतिरिक्त 15,000 ट्रॅव्हल पॉइंट देते. मात्र या क्रेडिट कार्डसाठी 3,000 रुपये वार्षिक शुल्क द्यावे लागेल.
IDFC FIRST Wealth Credit Card : आंतरराष्ट्रीय ट्रान्सझॅक्शनवर या क्रेडिट कार्डद्वारे 1.5 टक्के फॉरेक्स मार्कअप आकारला जातो. यामध्ये कार्डधारकांना दर तिमाहीत 4 एअरपोर्ट लाउंज वापरण्याची सुविधा मिळते. त्याबरोबरच या क्रेडिट कार्डद्वारे 1500 हून जास्त रेस्टॉरंटमध्ये 20 टक्के सवलतही मिळते. तसेच यावर कोणतीही वार्षिक शुल्क देखील द्यावे लागणार नाही.
Standard Chartered EaseMyTrip Credit Card : EaseMyTrip वेबसाइट आणि अॅपवरून हॉटेल आणि फ्लाइटच्या बुकिंगवर या क्रेडिट कार्डद्वारे अनुक्रमे 20 टक्के आणि 10 टक्के सवलत मिळते. यासोबतच कार्डधारकाला बसच्या तिकीट बुकिंगवर 125 रुपयांची सूटही मिळते. याबरोबरच स्टँडअलोन हॉटेल आणि एअरलाइन वेबसाइट्स, अॅप्स किंवा आउटलेटवर तिकीट बुक करण्यासाठी खर्च केलेल्या प्रत्येक 100 रुपयांवर 10X रिवॊर्डस देखील मिळतात.
InterMiles HDFC Bank Signature Credit Card : या क्रेडिट कार्ड द्वारे पहिल्या 30 दिवसांमध्ये जॉइनिंग केल्यावर 8,000 पर्यंत इंटरमाइल्स आणि 6,000 खर्च केल्यावर 3,000 इंटरमाइल्स पर्यंतचा बोनस मिळतो. याद्वारे अनुक्रमे 750 रुपये आणि 2,000 रुपये किंमतीचे फ्लाइट आणि हॉटेल डिस्काउंट व्हाउचर आणि पहिल्या वर्षासाठी आणि रिन्यूअलवर इंटरमाइल्स सिल्व्हर मेम्बरशिप देखील देते. याबरोबरच या कार्डच्या युझरला इंटरमाइल्स वेबसाइटद्वारे फ्लाइट तिकीट बुक करण्यासाठी इंटरमाइल्स रिडीम करता येईल. मात्र या कार्डसाठी 2,500 रुपये वार्षिक शुल्क द्यावे लागेल.
अधिक माहितीसाठी ‘या’ वेबसाईटला भेट द्या : https://www.hdfcbank.com/personal/pay/cards/credit-cards/diners-privilege
हे पण वाचा :
Flipkart Sale मध्ये या गॅजेट्सवर ग्राहकांना मिळत आहेत जबरदस्त ऑफर्स, त्याविषयी जाणून घ्या
IDBI Bank च्या ‘या’ FD वर मिळेल 7.60% व्याज, जाणून घ्या अधिक तपशील
Bank Loan : शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी, आता फक्त मिस कॉल अन् मेसेज द्वारे अशा प्रकारे मिळेल कृषी लोन
New Business Idea : जास्त भांडवलाची गरज नसलेल्या ‘या’ व्यवसायाद्वारे मिळवा लाखो रुपये, सरकारकडूनही मिळेल मदत
Investment Tips :’या’ सरकारी योजनांमध्ये गुंतवणूक करून नवीन वर्षात मिळवा मोठा नफा