मुलींच्या भविष्याची चिंता मिटली ! सरकारने आणल्या ‘या’ जबरदस्त योजना

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | सरकार आपल्या देशातील वेगवेगळ्या घटकांचा विचार करून नेहमीच योजना आणत असतात. आणि यामध्ये मुली किंवा महिला या नेहमीच केंद्रस्थानी असतात. मुलींना त्यांच्या आयुष्यात चांगली कामगिरी करता यावी. चांगले शिक्षण घेता यावे .तसेच भविष्यात त्यांना कोणतीही आर्थिक समस्या येऊ नये. यासाठी सरकारने अनेक योजना आणल्या असतात. प्रत्येक पालकांना आपल्या मुलींचे शिक्षण तसेच लग्न अगदी चांगले व्हावे, अशी इच्छा असते. आणि यामुळे मुलीच्या जन्मापासूनच त्यांचे पालक त्यांच्या लग्नासाठी काहींना काही पैसे हे बँकांमध्ये ठेवत असतात.

परंतु आज आम्ही तुम्हाला मुलींसाठी काही खास योजना सांगणार आहोत. ज्यामध्ये तुम्ही पैसे गुंतवू ठेवू शकता तसेच सरकार कडून देखील तुम्हाला अनुदान मिळते. या योजना सरकारच्या योजना आहेत. त्यामुळे यामधील कोणताही धोका नाही. तुम्हाला यातील पैसे अगदी सुरक्षिततेसह मिळतील.

लेक लाडकी योजना

मुलींसाठी ही योजना सुरू केलेली आहे. महाराष्ट्र शासनाची लेक लाडकी योजना ही अत्यंत लोकप्रिय योजना आहे. 2023- 24 या वर्षात ही योजना सुरू करण्यात आली आहे. अनेक मुलींना उच्च शिक्षण घेण्याची इच्छा असते. परंतु आर्थिक दृष्ट्या त्यांना परवडणारे नसल्याने अनेक मुलींना त्यांचे शिक्षण सोडावे लागते. परंतु आता लेक लाडकी योजनेअंतर्गत जन्मापासून ते 18 वर्षापर्यंत ठराविक आर्थिक मदत करते. मुलीच्या जन्मापासून ते 18 वर्षापर्यंत जवळपास 75 हजार रुपये तुमच्याकडे जमा होतील. ही रक्कम सरकार टप्प्याटप्प्याने देते.

माझी कन्या भाग्यश्री योजना

महाराष्ट्र सरकारची माझी कन्या भाग्यश्री योजना देखील अत्यंत लोकप्रिय योजना आहे. 2016 साली ही योजना सुरू झाली आहे. या योजनेअंतर्गत जर दोन मुलींनंतर पालकांनी नसबंदी केली, तर सरकार त्यांच्या मुलींच्या नावे 50 हजार रुपये जमा करतात. तुम्ही देखील दोन मुलींचे पालक असाल आणि कुटुंब नियोजनाचा प्रयत्न करत असाल, तर तुमच्या दोन्ही मुलींना सरकारकडून 25 – 25 हजार रुपये मिळतील. तुमच्या मुलीचे वय 18 वर्ष पूर्ण झाल्यानंतर संपूर्ण रक्कम सरकारकडून मुलींना मिळेल. परंतु या पैशांवर कोणत्याही प्रकारचे व्याज आकारले जाणार नाही.

बालिका समृद्ध योजना

मुलींसाठी असणारी बालिका समृद्ध योजना ही अत्यंत फायदेशीर योजना आहे. तुम्ही तुमच्या लहान मुलीच्या नावावर देखील पैसे जमा करण्यासाठी या योजनेमध्ये सहभाग घेतला, तर या योजनेतून ही योजना मुलींचा जन्म झाल्याबद्दल तिच्या आईला पाचशे रुपयांची सबसिडी मिळेल. त्यानंतर शिक्षण घेत असणाऱ्या मुलींना 300 रुपये ते 1000 रुपयांपर्यंत स्कॉलरशिप देखील दिली जाते. ही योजना मुलींसाठी अत्यंत फायदेशीर योजना आहे.

सुकन्या समृद्धी योजना

सुकन्या समृद्धी योजना ही एक लोकप्रिय योजना आहे. या योजनेच्या लाभ आत्तापर्यंत अनेक लोकांनी घेतलेला आहे. अनेक पालक मुलींच्या भविष्यासाठी या योजनेमध्ये गुंतवणूक करतात. ही योजना तुम्ही 10 वर्षासाठी आहे. यामध्ये तुम्ही वर्षाला कमीत कमी 250 रुपये गुंतवणूक करू शकता. या योजनेत जास्तीत जास्त गुंतवणूक 1.5 रुपये पर्यंत करू शकतात.