Best Indian Cricket Captain : विराट, रोहित की धोनी? बेस्ट कॅप्टन कोण? शमीने घेतलं ‘हे’ नाव

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Best Indian Cricket Captain । भारताचा स्टार जलदगती गोलंदाज मोहम्मद शमीने (Mohammed Shami) त्याच्या आवडत्या कर्णधाराचे नाव सांगितलं आहे. मोहम्मद शमी विराट कोहली, रोहित शर्मा आणि महेंद्रसिंह धोनी या तिन्ही कर्णधाऱ्यांच्या नेतृत्वाखाली क्रिकेट खेळला आहे. त्यामुळे यांच्यापैकी कोणता कर्णधार सर्वोत्तम आहे असा प्रश्न त्याला एका वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात विचारला होता. यावेळी शमीने तिन्ही कर्णधारांची वेगवेगळी स्टाईल सांगितली. यामध्ये त्याने महेंद्रसिंह धोनी (MS Dhoni) ला आपला आवडता कर्णधार म्हंटल आहे.

शमी म्हणाला, विराट कोहली, रोहित शर्मा आणि महेंद्रसिंह धोनी यांच्यापैकी सर्वोत्तम कर्णधार कोण याचे उत्तर देणे कठीण होईल. कारण मला वाटते की तिघांचीही तुलना करणे चुकीचे आहे. परंतु हे बघितलं पाहिजे कि कोणाच्या नेतृत्वाखाली भारताला सर्वाधिक यश मिळाले. धोनीने भारताला विश्वचषक जिंकून दिला आहे. खरं तर सर्व कर्णधारांचे काम करण्याची ही एक वेगळी पद्धत असते, परंतु जर आपण यशाकडे बघितलं आणि तयच मोजमाप केलं तर नक्कीच महेंद्रसिंह धोनी हा विराट कोहली आणि रोहित शर्मापेक्षा सरस कर्णधार (Best Indian Cricket Captain) आहे असं मत मोहम्मद शमीने व्यक्त केलं.

तिन्ही कर्णधारांचे वेगळेपण काय?? Best Indian Cricket Captain

यावेळी मोहम्मद शमीने तिन्ही कर्णधारांचे वेगळेपण सुद्धा सांगितलं आहे. शमीच्या मते, धोनी जास्त बोलत नाही. पण त्याच्याकडे सर्वाना चकित करतील अशा रणनीती असतात, तर विराट कोहली (Virat Kohli) मैदानावर अतिशय आक्रमक असतो. दुसरीकडे रोहित शर्माची (Rohit Sharma) पद्धत या दोघांपेक्षा वेगळी आहे. रोहितकडे या सर्व गोष्टी आहेत.

दरम्यान, मोहम्मद शमी सध्या सुसाट फॉर्मात आहे. नुकत्याच पार पडलेल्या एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत त्याने सर्वाधिक विकेट घेत समोरच्या फलंदाजांची भंबेरी उडवली होती. भारतने भलेही वर्ल्डकप हरला असला तरी शमीच्या आक्रमक गोलंदाजीने संपूर्ण क्रिकेट विश्व चकित झालं होते. त्याच्या या कामगिरीमुळे सरकारकडून त्याचा अर्जुन पुरस्काराने सन्मानही करण्यात आला.