Best Investment Options | आनंदाची बातमी ! ‘ही’ बँक झिरो बॅलन्स खाते असेल तरीही देते FD वर ‘एवढे’ व्याज

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Best Investment Options | आजकाल प्रत्येकजण आपल्या भविष्याचा विचार करून काही ना काही आर्थिक गुंतवणूक करत असतात. जेणेकरून आयुष्यात कोणताही प्रसंग आला, तरी आर्थिक बाजूने ते नेहमीच सक्षम राहतील. भविष्यासाठी गुंतवणूक करण्याच्या सरकारच्या देखील अनेक योजना आहेत. त्यात देखील अनेक लोक गुंतवणूक करत असतात. परंतु आजकाल फिक्स डिपॉझिट म्हणजेच FD हा गुंतवणुकीचा सगळ्यात चांगला पर्याय मानला जातो. आजकाल गुंतवणुकीचे अनेक पर्याय उपलब्ध आहेत, तरी देखील लोक मुदत ठेवीवर जास्त विश्वास ठेवतात. याचे कारण म्हणजे एफडी ही एक सुरक्षित गुंतवणूक आहे आणि यामध्ये तुम्हाला खूप चांगला परतावा देखील मिळतो.

पण तुम्हाला एक गोष्ट माहित आहे का? तुमचे सेविंग अकाउंट असले तर तुम्हाला फिक्स डिपॉझिट म्हणजेच एफडीवर व्याज मिळू शकते. त्यासाठी तुम्हाला किमान शिल्लक ठेवण्याची देखील गरज नाही. आता ही सुविधा कुठे उपलब्ध आहे आणि कोणत्या नागरिकांसाठी उपलब्ध आहे याची सविस्तर माहिती आज आपण जाणून घेऊया.

बँकेमध्ये आपले जे सेविंग अकाउंट असते (Best Investment Options) त्यामध्ये पैसे शिल्लक राहणे खूप गरजेचे असते. तुम्ही जर असे केले नाही तर त्यासाठी बँक आपल्याकडून शुल्क घेतात. जर आपण बचत खात्यांवरील व्याजदर बद्दल बोललो तर तो दर साधारणपणे चार टक्के एवढा असतो.

परंतु अशी एक बँक आहे जिथे तुम्हाला मुदत ठेवी सारखे व्याज मिळते. म्हणजेच बचत खात्यावरील कोणत्याही किमान शुल्काशिवाय तुम्हाला एफडी इतके व्याज दिले जाते. नुकतेच आरबीएल या बँकेने गो खाते नावाने एक डिजिटल बचत खाते सुरू केले आहे. जे शून्य शिल्लक खाते आहे. ज्यावर तुम्हाला 7.5 टक्के दराने परतावा मिळतो. आता या बँकेबद्दलची आपण माहिती जाणून घेऊया.

आरबीएल बँकेच्या वेबसाईटनुसार या बचत खात्यावर तुम्हाला फ्री प्रीमियम गो, डेबिट कार्ड, फ्रि क्रेडिट कार्ड त्याचप्रमाणे रोख पैसे काढण्याची सुविधा आहे. तसेच एक कोटी रुपयांचे सायबर विमा संरक्षण, अपघात विमा संरक्षण आणि प्रवास विमा संरक्षण देखील दिलेले आहे.

हे झिरो बॅलन्स खाते सबस्क्रिप्शन बँक खाते आहे. हा लाभ घेण्यासाठी तुम्हाला वार्षिक शुल्क भरावे लागते. पहिल्या वर्षाचे सबस्क्रीप्शन घेण्यासाठी एक हजार 999 रुपये भरावे लागतात त्यानंतर न तुम्हाला दरवर्षाला 500 रुपये द्यावे लागतात. त्याचप्रमाणे तुम्हाला यासाठी जीएसटी देखील भरावा लागतो. परंतु या खात्यात येणाऱ्या डेबिट कार्ड द्वारे तुम्ही वर्षभरात 1 लाख रुपयांपेक्षा जास्त खर्च केलात तर हा वार्षिक शुल्क तुमच्यासाठी माफ केला जातो. (Best Investment Options)

विशेष शून्य शिल्लक खाते कसे उघडायचे? | Best Investment Options

या आरबीएल बँकेचे शून्य शिल्लक खाते उघडण्यासाठी तुमच्याकडे पॅन कार्ड , आधार कार्ड असणे गरजेचे आहे. तुमच्याकडे ही कागदपत्र असेल तर तुम्ही ऑनलाईन पद्धतीने हे खाते उघडू शकता. ते डिजिटल खाते असल्याने तुम्ही घरबसल्या देखील मोबाईल वरून सहज हे खाते सांभाळू शकता.