Best Places To Visit In Pune : पुण्यात एक्स्प्लोर करता येतील अशी सर्वोत्तम 10 ठिकाणे; माहित नसतील तर जाणून घ्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Best Places To Visit In Pune) पुणे म्हणजे विद्येचं माहेर घर. महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी म्हणून ख्याती असणाऱ्या पुण्यात विविध जिल्ह्यातून, गावातून केवळ शिक्षणासाठी अनेक मुले येत असतात. पुण्याची संस्कृती, ऐतिहासिक वारसा स्थळे आणि खाद्य संस्कृती जगभरात प्रसिद्ध आहे. त्यामुपे पुणे तिथे काय उणे? असेही म्हटले जाते. अनेक पर्यटक वीकेंडला फिरायला जायचं म्हणून पुण्याची निवड करतात. कारण मुंबईपासून अगदी जवळ असणाऱ्या पुण्यात पाहण्यासारखी अनेक ठिकाण आहेत.

पुणे म्हटलं की, पुणेरी मिसळ, एसपीडीपी आणि मस्तानीची चव अचानक जिभेवर रेंगाळू लागते. यासोबत पुण्यात ऐतिहासिक वास्तू आणि वस्तूंचे केलेले जतन खरोखरच पाहण्यासारखे आहे. (Best Places To Visit In Pune) त्यामुळे एखाद्या दिवशी शॉर्ट पिकनिक म्हणून देखील पुण्याला जाणार असाल तर कुठे फिरायचं हे आधी जाणून घ्या. आज आम्ही तुम्हाला पुण्यातील अशाच काही महत्वाच्या ठिकाणांची माहिती देणार आहोत. जिथे न केवळ तुम्ही तर तुमच्यासोबत लहान मुलांनादेखील फिरायला घेऊन जाता येईल आणि महाराष्ट्राच्या इतिहासाचे काही दाखले दाखवता येतील.

1. शनिवार वाडा (Best Places To Visit In Pune)

पुणे शहरातील जगप्रसिद्ध ऐतिहासिक वास्तू म्हणजे शनिवार वाडा. हा वाडा पेशवेकालीन आहे. त्या काळी मराठा पेशवे येथे वास्तव्यास होते. पहिले बाजीराव पेशवा यांनी सन १७३६ मध्ये हा वाडा बांधला होता. त्याकाळी बांधलेला हा अत्यंत भव्य असा लाकडी राजवाडा होता. कालांतराने इंग्रजांनी अत्यंत कुत्सित भावनेने हा वाडा नष्ट केला. त्यामुळे आता या वाड्याचा केवळ पाया शिल्लक आहे. तरीही हा पाया आणि कमान पाहून ऐतिहासिक वास्तू पाहण्याचा आनंद घेता येतो. त्याची भव्यता आणि बांधकाम तुम्हाला मोहित करू शकते.

2. लाल महल

पुण्यातील ऐतिहासिक वास्तूंमध्ये शहराच्या मध्यस्थानी असलेल्या लाल महलचादेखील समावेश आहे. असे म्हणतात की, या लाल महलमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे वास्तव्य होते. (Best Places To Visit In Pune) पुण्यात याच वास्तूत शिवाजी महाराजांचे बालपण गेले. इतकेच नव्हे तर, याच वास्तूत त्यांनी स्वराज्याकडे घाणेरड्या नजरेने पाहणाऱ्या शाहिस्तेखानाची बोटे छाटली होती. पुढे जाऊन पुणे महानगरपालिकेने या महालाची पुर्नबांधणी केली आणि आज ही वास्तू एक प्रेक्षणीय स्थळ म्हणून पहायला पर्यटक येतात.

3. आगा खान पॅलेस

गांधी मेमोरिअल सोसायटीचा ‘आगा खान पॅलेस’ पुण्यातील अत्यंत प्रसिद्ध पर्यटन स्थळ आहे. त्याची बनावट ही खास इटालियन पद्धतीची आहे. या पॅलेसच्या उपयोग ब्रिटीश राजवटीत तुरुंग म्हणून केला होता. भारत छोडो आंदोलनात सहभागी झालेल्या महात्मा गांधी, कस्तूरबा गांधी, महादेव भाई यांना इथेच कारावासात ठेवले होते. या ठिकाणी महादेव भाई आणि कस्तूरबा गांधी यांचे निधन झाल्याचे सांगितले जाते. त्यामुळे या पॅलेसमध्ये त्यांच्या स्मारकाची बांधणी केली आहे.

4. विश्रामबाग वाडा

मराठा पेशवा दुसरा बाजीराव यांचे निवासस्थान विश्रामबाग वाडा देखील पुण्यातील ऐतिहासिक वास्तु आहे. दुसरे बाजीराव यांनी वडिलोपार्जित शनिवारवाड्यात राहण्यापेक्षा विश्रामबागेत राहणे पसंत केले आणि ते इथेच वास्तव्यास होते याचे बरेच दाखले आहेत. (Best Places To Visit In Pune) पुढे जाऊन पुणे महानगरपालिकेने या ठिकाणी एक सांस्कृतिक केंद्र सुरू केले आहे. जे खरोखरच पाहण्यासारखे आहे.

5. भाऊसाहेब रंगारी वाडा

स्वातंत्र्यापूर्वी क्रांतिकारकांची हक्काची जागा म्हणून श्रीमंत भाऊसाहेब रंगारी वाडा उभारण्यात आला होता. भाऊसाहेब इथे वास्तव्यास नव्हते. मात्र, ते राजवैद्य असल्याने हा वाडा दवाखाना म्हणून ओळखला जायचा. (Best Places To Visit In Pune) तेव्हा क्रांतिकारकांच्या गुप्त बैठकांसाठी हा वाडा कामी येत होता. त्याकाळी येथे गुप्त मार्ग, भुयारी मार्ग होते. शस्त्र लपवायला जागा होती. आश्रय या वाड्याचे महत्व पुढील पिढयांना कळावे म्हणून २०२२ मध्ये जीर्णोद्धार करुन हा वाडा लोकांसाठी खुला करण्यात आला.

6. श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर

पुण्यातील अत्यंत मोठे श्रद्धास्थान म्हणजे श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती. प्लेगच्या साथीने आपला एकुलता एक मुलगा गमावल्यानंतर श्री दगडूशेठ हलवाई आणि त्यांची पत्नी लक्ष्मीबाई यांनी हे मंदिर उभारले होते. (Best Places To Visit In Pune) पुढील काळात लोकमान्य टिळकांनी लोकांना स्वातंत्र्य लढ्यात एकत्र आणण्यासाठी सुरु केलेल्या गणेशोत्सवात या ठिकाणाला आणखीच महत्व प्राप्त झाले. दरवर्षी नव्हे तर दर दिवशी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात अनेक भाविक बाप्पाच्या दर्शनासाठी येत असतात.

7. पर्वती

पुणे शहराच्या आग्नेय दिशेस उभी असलेली पर्वती टेकडी जगप्रसिद्ध ठिकाण आहे. पर्वताई देवीच्या नावावरुन या टेकडीला पर्वती असे नाव पडले. या टेकडीच्या माथ्याची उंची समुद्रसपाटीपासून सुमारे ६४० मीटर इतकी आहे. या टेकडीच्या माथ्यावर पोहोचण्यासाठी सुमारे १०३ पायर्‍या चढून जावे लागते. या पायऱ्या भव्य अशा नौबतखान्याजवळ संपतात आणि इथून पुढे या टेकडीच्या माथ्यावर देव देवेश्वर मंदिर तसेच अन्य काही देवी देवतांची मंदिरे पहायला मिळतात.

8. ओशो आश्रम

पुण्यातील ओशो आश्रम हे शहरातील कोरेगाव पार्क भागात २८ एकरांवर पसरलेले एक प्रकारचे रिसॉर्टच्या आहे. हे आश्रम १९७४ साली ओशोंनी बांधले होते. (Best Places To Visit In Pune) आसपासचा मनमोहक निसर्ग आणि आधुनिकतेचा मिलाप पहायचा असेल तर एकदा तरी ओशो आश्रमला जरूर भेट द्या. येथे बांबूचे कॉटेजेस दिसून येतील. शिवाय आश्रमातील संगमरवरी मंडप, कृत्रिम पाण्याचे झरे, थंड वारा आणि मोठा जलतरण तलाव येथील मुख्य आकर्षण आहेत. बरेच पर्यटक निसर्गाचा मनमुराद आनंद घेता यावा म्हणून इथे येत असतात.

9. ओकायामा फ्रेंडशिप गार्डन

पुण्यातील प्रसिद्ध पु.ल.देशपांडे गार्डनचे पूर्वीचे नाव ‘ओकायामा फ्रेंडशिप गार्डन’ असे होते. आजही बरेच लोक या गार्डनला याच नावाने ओळखतात. पुण्यातील सिंहगड रोडवर वसलेल्या या उद्यानाची रचना जपानी पद्धतीची आहे. माहितीनुसार, जपानमधील ओकोयामा शहरातील ३०० वर्षापूर्वीच्या प्रसिद्ध कोराक्वेन उद्यानाच्या धर्तीवर हे उद्यान विकसित करण्यात आले आहे. असे भारतातील हे एकमेव उद्यान आहे.

10. भिगवण पक्षी अभयारण्य

पुणे आणि सोलापूर जिल्ह्याच्या सीमेवर भिगवण पक्षी अभयारण्य आहे. जिथे जाणे निसर्गप्रेमी, पक्षी प्रेमी आणि पक्षी निरिक्षकांसाठी अत्यंत आनंद निर्माण करणे आहे. (Best Places To Visit In Pune) महाराष्ट्राचे भारतपूर म्हणून ओळखले जाणारे भिगवण हे फ्लेमिंगो पक्ष्यांसाठी प्रसिद्ध आहे. त्यामुळे अनेक पर्यटक या ठिकाणी गुलाबी फ्लेमिंगो पहायला येत असतात.