हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Best Tourist Places In Pune) कधीतरी कुठेतरी लांब मस्त शांत ठिकाणी फिरायला जाण्याचा मूड होतो. पण पुन्हा आठवतात ती रोजची घरातली काम, ऑफिसचा वर्क लोड आणि बरंच काही.. ज्यामुळे शांत झोप सुद्धा लागत नाही. मग कधीतरी खरोखर एखादा विकेंड प्लॅन करायला काय हरकत आहे? खूप लांब नाही पण खूप जवळही नको, निसर्गाच्या सानिध्यात आणि मनाला शांत वाटेल अशा ठिकाणी जायचं असेल तर बेस्ट लोकेशन निवडावं लागत. आता ते कसं शोधायचं? याचा कंटाळा म्हणून बऱ्याचदा विकेंड प्लॅन कॅन्सल होतात.
पण आता तुम्हाला विकेंड प्लॅन कॅन्सल करायची गरज नाही. इतकंच काय बेस्ट लोकेशन शोधायला वेबसाईट ढुंढाळायचीसुद्धा गरज नाही. (Best Tourist Places In Pune) कारण आज आम्ही तुम्हाला पुण्याच्या आसपास असणारी काही भन्नाट लोकेशन्स सांगणार आहोत. जे लाँग वीकेंडसाठी परफेक्ट डेस्टिनेशन ठरतील. भोवताली हिरवा निसर्ग, अंगावर शहारा आणणारी थंडी आणि अप्रतिम खाद्यसंस्कृती अनुभवण्यासाठी हे एकदम कमाल स्पॉट्स आहेत. आता हे स्पॉट्स नेमके कोणते? याविषयी पटकन जाणून घेऊया.
1. खंडाळा
पुण्याच्या अगदी जवळ असणारं खंडाळा हे एक थंड हवेचं सुंदर असं ठिकाण आहे. (Best Tourist Places In Pune) हे महाराष्ट्रातील प्रसिद्ध हिल स्टेशनपैकी एक असून पुण्यापासून सुमारे ६९ किलोमीटर अंतरावर आहे. या ठिकाणी फिरण्यासारखे अनेक स्पॉट्स आहेत. जे एक्स्प्लोर करताना निसर्गाचा सुंदर अनुभव घेणे तुमच्यासाठी फारच सुखद ठरेल. येथे ‘टायगर लीप’ नावाचे व्हिज्युअल स्पॉट आहे. शिवाय फिरण्यासारखे इतरही अनेक स्पॉट्स आहेत. त्यामुळे अनेक पर्यटक इथे आवर्जून येतात. खंडाळ्यातील धुकं आणि सुंदर निसर्ग तसेच आल्हाददायक वातावरण तुमच्या विकेंडला कमाल बनवेल.
2. लोणावळा (Best Tourist Places In Pune)
मुंबईकर आणि पुणेकर अगदी आवर्जून जातात असे निसर्गरम्य ठिकाण म्हणजे लोणावळा. लोणावळा हे पुण्यापासून अवघ्या काही किलोमीटर अंतरावर असल्यामुळे इथे लॉन्ग विकेंड काय शॉर्ट विकेंडसुद्धा अगदी सहज एन्जॉय करता येईल. लोणावळ्याजवळ फिरण्यासारखे अनेक स्पॉट्स आहेत/ जे तुम्हाला अगदी प्रेमात पाडतील. सुंदर निसर्ग, आल्हाददायी वातावरण, शुभ्र धुक्याची चादर आणि गुलाबी थंडी तुमचा मूड एकदम फ्रेश करेल. येथील टायगर पॉईंट, लॉयन पॉईंट पाहण्यासारखे आहेत. शिवाय येथे खूप उत्तम रिसॉर्ट्स आहेत. त्यामुळे लोणावळ्यात जाणे आणि स्टे करणे तुमच्या विकेंडचा एक सर्वोत्तम भाग ठरेल.
3. वाई
पुण्यापासून सुमारे ८५ किलोमीटर अंतरावर असलेले वाई हे कृष्णा नदीजवळ वसलेले अतिशय सुंदर पर्यटनस्थळ आहे. या ठिकाणाला ऐतिहासिक वारसा लाभला असून येथे अनेक सुंदर मंदिरे आहेत. (Best Tourist Places In Pune) वाईचा शांत परिसर, मनाला भुरळ घालणारा मनमोहक निसर्ग आणि आल्हाददायी वातावरण तुमच्या विकेंडला फ्रेशनेस देईल. इथली हिरवळ पाहून मन प्रसन्न होईलच. शिवाय पुणे ते वाई प्रवास करताना एक मस्त लॉन्ग ड्राइव्ह होईल. मुख्य रस्ता घाटातून जात असल्यामुळे निसर्गाचा अनोखा फील घेण्याची ही संधी अजिबात सोडू नका.
4. कामशेत
जर तुम्ही निसर्गप्रेमी असाल आणि त्यासोबत ट्रेकिंगची सुद्धा आवड असेल तर मात्र तुम्ही पुण्यातील कामशेत या सुंदर ठिकाणाला भेट द्यायलाच हवी. कामशेत हे महाराष्ट्राचे पॅराग्लायडिंग हब म्हणून सर्वत्र प्रसिद्ध आहे. अनेक पर्यटक इथे पॅराग्लायडिंग करण्यासाठी येतात. हे ठिकाण पुण्यापासून सुमारे ४८ किलोमीटर अंतरावर आहे. या ठिकाणी प्राचीन पर्वत, किल्ले, पुरातन मंदिरे (कोंडेश्वर मंदिर, विदेशेश्वर मंदिर, कार्ला, भाजा गुहा) पाहण्यासारखे आहेत. (Best Tourist Places In Pune) त्यामुळे विकेंड एन्जॉय करायचा असेल तर कामशेतला जरूर जा.