Best Travel Places : जूनच्या गरमीला कंटाळला असाल, तर ‘ही’ ठिकाणे करा एक्स्प्लोर; एकदम फ्रेश व्हाल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Best Travel Places) सहसा जून महिन्यात पावसाच्या रिमझिम सरी येऊ लागतात. पण नुकत्याच सरलेल्या उन्हाळ्याची झळ पूर्णपणे गेलेली नसते. यंदा देशातील बऱ्याच भागांमध्ये उष्णतेची भीषण लाट पहायला मिळाली. ज्यामुळे उष्माघात, सनस्ट्रोक, डिहायड्रेशन आणि इतर उन्हाळी आजरांची बरीच प्रकरणे समोर आली आहे. त्यामुळे यंदाचा उन्हाळा अक्षरशः दमवणारा ठरला. यामुळे जोपर्यंत धुवाँधार पाऊस कोसळत नाही तोपर्यंत मूड रिफ्रेश होणं जरा कठीण आहे.

(Best Travel Places) अशावेळी फ्रेश फिलिंगसाठी कुठेतरी फिरायला जावे असे कुणाला वाटणार नाही? मग तुम्हीही जूनमध्ये फिरायला जायचा विचार करत असाल तर आज आम्ही तुम्हाला काही खास ठिकाणांची माहिती देणार आहोत. जिथे फिरताना तुम्ही एकदम ताजेतवाने फील कराल. चला लगेच जाणून घेऊया.

तवांग

ईशान्य भारतात ‘तवांग’ हे अत्यंत लोकप्रिय पर्यटन स्थळ म्हणून ओळखले जाते. तवांग हे एक सुंदर आणि थंड असे हिलस्टेशन आहे. जे अरूणाचल प्रदेशमध्ये स्थित असून सध्या इथे जून महिन्यात कमाल तापमान १९ अंश सेल्सिअस तर किमान तापमान ९ अंश सेल्सिअसच्या आसपास आहे. त्यामुळे, इथे उन्हाच्या कितीही झळा लागत असल्या तरी तवांगमध्ये मात्र वातावरण थंड आहे. (Best Travel Places)

अशा थंड वातावरणात तुम्ही आपल्या मित्र मैत्रिणी किंवा कुटुंबासोबत निवांत वेळ घालवू शकता. तवांगमध्ये तुम्हाला बर्फाळ भाग, खोल दऱ्याखोऱ्या आणि उंच झाडांचे सुंदर नजारे आकर्षित करतील. शिवाय येथे पाहण्यासारखे बरेच स्पॉट्स आहेत. जे तुमचा मूड रिफ्रेश व्हायला मदत करतील.

लेह लडाख (Best Travel Places)

जून महिना सुरु झाला असला तरी गरमीपासून काही सुटका होत नाहीये. अशा दिवसात कुठेतरी थंड गार ठिकाणी जावे आणि रिफ्रेश व्हावे कुणाला वाटणार नाही? तुमचाही असाच विचार असेल तर तुम्ही लेह- लडाखला भेट देऊ शकता. इथे कडक उन्हाळ्यातही तुम्ही थंडगार हवेचा आनंद घेऊ शकता. लेह, लडाखमधील प्रेक्षणीय स्थळे, खोल दऱ्याखोऱ्या, नयनरम्य तलाव आणि उंच उंच बर्फाचे डोंगर तुम्हाला अविस्मरणीय आठवणी देतील. त्यामुळे जूनमध्ये फिरायला जायचा प्लॅन करताय तर लेह लडाखचा विचार नक्की करा.

हेमकुंड

उत्तराखंड राज्यातील हेमकुंड हे अत्यंत सुंदर आणि पर्यटकांसाठी आकर्षण असलेले एक ठिकाण आहे. जून महिन्यातील उष्णता हेमकुंडमध्ये फिरताना अजिबात जाणवत नाही. (Best Travel Places) सध्याच्या तापमानाबद्दल बोलायचं झालं तर, हेमकुंडचं कमाल तापमान ९ अंश सेल्सिअसच्या आसपास असेल. त्यामुळे, उन्हाची झळ लागायचा सवालच नाही.