BH Series Number Plate : ‘या’ व्यक्तींनाच मिळते BH सिरीज नंबर प्लेट ; पात्रता काय अन अर्ज कसा करायचा ?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

BH Series Number Plate । आपण रस्त्यावर गाड्या पाहतो त्यावर वेगवेगळे नंबर सिरीज असतात. उदाहरणार्थ महाराष्ट्रातील वाहन असेल तर त्यावर MH सिरीज पाहायला मिळते. गुजरात मधील वाहन असेल तर GJ आणि तामिळनाडू येथील गाडी असेल तर TN पासून सुरु होणार नंबर सिरीज असते. परंतु तुम्ही कधी कोणत्या गडीवर BH नंबर सिरीज बघितला आहे का? असेल तर तुम्हाला नक्कीच प्रश्न पडला असेल कि BH चा नेमका अर्थ काय? आणि कोणाला अशा नावाची नंबर प्लेट मिळते? चला तर मग आम्ही तुम्हाला याबाबत संपूर्ण माहिती सांगतो.

BH सिरीजचा अर्थ काय? BH Series Number Plate

मित्रानो, BH नंबर सिरींजचा अर्थ आहे भारत… काही व्यक्तींना व्यवसायासाठी किंवा नोकरीसाठी एका राज्यातून दुसऱ्या राज्यात जावं लागते. अशावेळी RTO ने त्यांचं चलन काटू नये अथवा त्यांना पुन्हा रेजिस्ट्रेशन करायला लागू नये म्हणून हि सुविधा उपलब्ध आहे. वाहनाचे राज्यांदरम्यान स्थलांतरण सुलभतेने व्हावं यासाठी हा नवा नियम तयार करण्यात आला आहे. यापूर्वी एका राज्यातून दुसऱ्या राज्यात गाडी घेऊन गेल्यानंतर नव्याने सदर गाडीचे रजिस्ट्रेशन करायला लागत होते, त्यासाठी RTO कार्यालयाला सतत हेलफाटे घालायला लागायचं. मात्र आता BH नंबर सिरीज मुळे हे सर्व प्रश्न सुटले आहेत. परंतु ही सिरीज सर्वसामान्य व्यक्तींसाठी नाही, त्यासाठी काही नियम आणि अटी आहेत.

कोणाला मिळते BH नंबर सिरींज-

सरकारकडून ज्या व्यक्तींना BH नंबर सिरींज (BH Series Number Plate) देण्यात येते यामध्ये राज्य आणि केंद्र सरकारचे कर्मचारी, संरक्षण क्षेत्रातील कर्मचारी, बँक कर्मचारी, प्रशासकीय सेवा कर्मचारी आणि चारपेक्षा जास्त राज्ये किंवा केंद्रशासित प्रदेशांमध्ये कार्यालये असलेल्या खाजगी कंपन्यांचे कर्मचारी यांचा समावेश आहे. या व्यतिरिक्त अन्य कोणालाही BH नंबर सिरींज मिळू शकत नाही.

कसा करायचा अर्ज?

जर तुम्हाला BH सीरीज नंबर प्लेट मिळवायची असेल, तर सर्वात आधी तुम्हाला रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाच्या वाहन पोर्टलवर लॉग इन करावे लागेल, parivahan.gov.in/parivahan//node/1978.
त्यानंतर येथे तुम्हाला ‘वाहन नोंदणी’ वर क्लिक करावी लागेल.
आता तुम्हाला तुमचे राज्य निवडावे लागेल आणि त्यानंतर ‘Apply For New Registration’ या पर्यायावर क्लिक करा.
त्यानंतर तुम्हाला मेनूमधून ‘Bharat Series’ निवडावी लागेल.
आता तुमच्या गाडीबद्दल योग्य माहिती भरा. म्हणजेच जसे की वाहन मालकाचे नाव, वाहन चेसिस आणि इंजिन क्रमांक इ.
त्यानंतर तुम्हाला आयडी प्रूफ अपलोड करावा लागेल
आता तुमचा पत्ता, तसेच इतर आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
यानंतर तुम्हाला नोंदणी शुल्क जमा करावे लागेल. ती भरल्यानंतर तुम्हाला एक स्लिप मिळेल, ती सुरक्षितपणे ठेवा.
आता शेवटी RTO तुमच्या अर्जाची पडताळणी करेल आणि तपासणीत योग्य आढळल्यास तुम्हाला नंबर प्लेट (BH Series Number Plate) दिली जाईल