धोनीच्या हातात ‘भगवत गीता’, हेच आहे का कॅप्टन कुलच्या यशाचे रहस्य?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारताचा माजी कर्णधार आणि सध्याचा चेन्नई सुपर किंग्सचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीची (MS Dhoni) चर्चा तर कायमच होते. नुकत्याच पार पडलेल्या आयपीएल मध्ये धोनीच्या नेतृत्त्वाखाली चेन्नईने (Chennai Super Kings) दमदार कामगिरी करत ट्रॉफी आपल्या नावावर केली. त्यानंतर चेन्नईचे चाहते या विजयाचा आनंद साजरा करत असतानाच धोनीची गुडघेदुखी समोर आली आणि त्याला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट व्हाव लागतंय हे समजताच चाहत्यांची चिंता वाढली. त्यानंतर आता धोनीचा एक नवा फोटो व्हायरल झाला आहे ज्यामध्ये त्याच्या हातात भगवत गीता दिसत आहे.

त्याच झालं असं कि, धोनीला गुडघ्याच्या शस्त्रक्रियेसाठी मुंबईतील कोकिला बेन रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याचवेळी धोनीचा एक फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या फोटो मध्ये धोनी कार मध्ये बसला आहे आणि त्याच्या हातात श्री भगवद्गीता आहे. धोनीच्या चेहऱ्यावर मोठी स्माईल दिसत आहे. धोनीचा हा अनोखा अंदाज पाहून त्याचे चाहते नक्कीच खुश झाले असतील.

दरम्यान, आयपीएल 2023 नंतर महेंद्रसिंग धोनी आयपीएलमधून निवृत्तीची घोषणा करेल अशा चर्चा सुरु होत्या. मात्र त्याने निवृत्ती जाहीर केलेली नाही. शरीराने साथ दिल्यास आपण आयपीएल 2024 मध्ये पुन्हा खेळताना दिसू असं धोनीने स्पष्ट केलं. तो नक्की खेळणार की नाही हे अद्याप निश्चित नाही. कारण हे त्याच्या फिटनेसवर अवलंबून असेल असे धोनीने सांगितले. या वर्षी मी जिथे जिथे गेलो आहे तिथे तिथे मला लोकांचे प्रेम मिळालं आहे. चाहत्यांना मी धन्यवाद बोलतो, परंतु माझ्यासाठी कठीण काम म्हणजे पुढचे 9 महिने कठोर परिश्रम करणे आणि परत येऊन किमान एक सीझन खेळणे असं धोनी म्हणाला होता.