टीम, HELLO महाराष्ट्र। नागरिकत्व दुरुस्ती विधेयक बुधवारी राज्यसभेतही ८ तासांच्या चर्चेनंतर मंजूर करण्यात आले. विधेयकाच्या बाजूने १२५ तर, विरोधात १०५ मते पडली. विधेयकावरून घूमजाव करणाऱ्या शिवसेनेने राज्यसभेत सभात्याग केला. राष्ट्रपतींच्या स्वाक्षरीनंतर विधेयकाचे कायद्यात रुपांतर होणार आहे. सध्या या विधेयकाला बऱ्याच ठिकाणाहून तीव्र विरोध होत आहे.
मात्र या निर्णयाचे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह भय्याजी जोशी यांनी स्वागत केले आहे. ‘नागरिकत्व सुधारणा विधेयक आणण्यासाठी उचलेल्या धाडसी पावलाबाबत आम्ही केंद्र सरकार, पंतप्रधान व गृहमंत्री अमित शाह यांचे आभार मानू इच्छितो. भारतात राहणाऱ्या निर्वासितांना (अफगाणिस्तान, पाकिस्तान आणि बांगलादेशातील) सन्मानाचे स्थान देणे हा सध्याच्या सरकारचा मोठा उपक्रम आहे, आम्ही त्यांचे स्वागत करतो’ असे देखील भय्याजी जोशी यांनी म्हटले आहे.