हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Bhambavli Vajrai Waterfall) पावसाळा सुरु झाला की, सगळ्यांनाच फिरायला जायचे वेध लागतात. बरेच लोक मान्सून ट्रीपसाठी सुंदर लोकेशन्सच्या शोधात असतील. तुम्हीही पावसाच्या सरी मनसोक्त एन्जॉय करण्यासाठी फिरायला जायचा प्लॅन करताय का? तर आज आम्ही तुम्हाला ज्या ठिकाणाविषयी सांगणार आहोत तिथे नक्की जा.
आजपर्यंत तुम्ही पावसाळ्यात बऱ्याच ट्रिप केल्या असतील. ज्यामध्ये तुम्ही कितीतरी लहान मोठे धबधबे पाहिले असतील. पण तुम्ही आशिया खंडातील सगळ्यात उंच धबधबा पाहिला आहे का? नसेल पाहिला तर या पावसाळ्यात नक्की जा. आज आपण याच धबधब्याविषयी माहिती घेणार आहोत. (Bhambavli Vajrai Waterfall) मुख्य म्हणजे आशिया खंडातील सगळ्यात मोठा धबधबा हा महाराष्ट्रात आहे. या धबधब्याचे नाव ‘भांबवली वजराई’ असे आहे. चला तर या धबधब्याविषयी अधिक आणि सविस्तर माहिती घेऊया.
भांबवली वजराई धबधबा (Bhambavli Vajrai Waterfall)
आशिया खंडातील सर्वात उंच धबधबा म्हणून ‘भांबवली वजराई’ हा धबधबा ओळखला जातो. मुख्य म्हणजे, हा धबधबा आपल्या महाराष्ट्र राज्यातील सातारा जिल्ह्यात आहे. सातारा शहरापासून ३२ किलोमीटर अंतरावर असलेल्या भांबवली गावात हा धबधबा आहे. प्रसिद्ध कास तलावापासून पुढे सुमारे ५ किलोमीटर अंतरावर या धबधब्याचे अत्यंत सुंदर आणि डोळ्याचे पारणे फिटेल असे विहंगम दृष्य पहायला मिळते. हा संपूर्ण देशातील सर्वात उंच धबधबा असल्यामुळे तो पाहण्यासाठी कायम पर्यटकांची गर्दी दिसते.
देशातील सर्वात उंच धबधबा
सातारा जिल्ह्यातील ‘भांबवली वजराई’ या धबधब्याची उंची तब्बल १ हजार ८४० फूट इतकी आहे. शिवाय हा धबधबा अत्यंत घनदाट जंगलात असल्याने त्याच्या आसपासचा परिसर फारच सुंदर आहे. (Bhambavli Vajrai Waterfall) देशातील सर्वात उंच असा हा धबधबा उरमोडी नदीत उगम पावतो. थेट उभ्या दगडांवरून कोसळणारा हा धबधबा अत्यंत सुंदर आणि नयनरम्य असल्याने इथे जाताक्षणी इतर सगळ्या गोष्टींचा विसर पडतो. हा धबधबा उभ्या दगडावरून साधारण तीन टप्प्यात कोसळतो. कोसळताना त्याच फेसाळलेलं पाणी पाहणं आणि त्याचा आवाज ऐकणं मनाला शांतता देणारं ठरतं.