Saturday, March 25, 2023

धक्कादायक! किरकोळ वादातून भर चौकात बांधकाम ठेकेदाराची हत्या

- Advertisement -

भंडारा : हॅलो महाराष्ट्र – राज्यात गुन्हेगारीच्या प्रमाणात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. एखाद्या क्षुल्लक कारणावरून लोक हत्या (Murder) करताना दिसत आहेत. अशीच एक घटना भंडारा जिल्ह्याच्या तुमसर शहरातील हसाराटोली परिसरात घडली आहे. यामध्ये जुन्या वादात बांधकाम ठेकेदार असलेल्या शेजाऱ्याचा दोन भावांनी धारदार सुऱ्याने डोक्यावर व मानेवर सपासप वार करून हत्या (Murder) केली आहे. या प्रकरणी तुमसर पोलिसांनी दोन भावांना अटक केली आहे. विजय श्रीराम नखाते असे मृत व्यक्तीचे नाव आहे तर गणेश बरेकर व कृष्णा बरेकर असे आरोपी भावांची नावे आहेत.

काय आहे नेमके प्रकरण ?
मृत व्यक्तीच्या बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणी आरोपींचे दोन दिवसापूर्वी भांडण झाले होते. तुमसर शहराला लागूनच असलेली हसाराटोली येथे शुक्रवारी रात्रीच्या दरम्यान स्थानिक बौद्ध विहार जवळ विजय यांची हत्या (Murder) करण्यात आली. या घटनेची माहिती मिळताच तुमसर पोलिस घटनास्थळी दाखल झाले. मृत विजय हा बांधकामाचे खाजगी ठेके घेऊन काम करणारा होता. त्यात विजयच्या परिचयाच्या आरोपी कृष्णा व गणेश यांचे कामाच्या ठिकाणी घटनेच्या दोन दिवसा पूर्वी शुल्लक कारणावरू वाद झाला होता. याचाच राग मनात धरून आरोपींनी विजयची हत्या (Murder) केली. या घटनेचा पुढील तपास तुमसर पोलीस करीत आहेत.

- Advertisement -

वैनगंगा नदीत बुडून तरुणाचा मृत्यू
भंडारा जिल्ह्यात एक धक्कादायक प्रकार घडला आहे. मागच्या आठ दिवसांपूर्वी काकांचे निधन झाले होते त्यांच्या अस्थि विसर्जनाकरीता आलेल्या पुतण्याचा वैनगंगा नदीत बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. दरम्यान यामध्ये 4 जण वाहून गेले होते यातील तिघे थोडक्यात बचावले आहेत.ही घटना भंडारा जिल्ह्याच्या तुमसर तालुक्यातील माडगी नदीघाटावर घडली आहे. प्रणिकेत शिवराम पराते मृत पावलेल्या तरुणाचे नाव आहे.

हे पण वाचा :
महाराष्ट्र नाही तर आता ‘या’ राज्यात मिळेल महाग पेट्रोल
शिंदे- फडणवीसांचा पहिल्याच मंत्रिमंडळाच्या बैठकीत मास्टरस्ट्रोक : घेतले ‘हे’ 9 महत्वाचे निर्णय
Corona चा नवीन BA.5 व्हेरिएन्ट आधीपेक्षा जास्त घातक आहे ???
सध्याच्या जोखमीच्या काळात सोन्यामध्ये गुंतवणूक करावी की नाही ???|
ICICI Bank कडून FD वरील व्याज दरात वाढ !!!