BHIM UPI ची खास ऑफर; ऑनलाईन पेमेंटवर बंपर कॅशबॅक

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

BHIM UPI : मित्रानो, सध्याचे जग हे ऑनलाईन जग आहे. तंत्रज्ञानाच्या मदतीने आपण अनेक कामे ऑनलाईन पद्धतीने करत आहोत. आजकाल UPI पेमेंटच्या माध्यमातून एकमेकाना पैसे सुद्धा ऑनलाईन पद्धतीने पाठवले जात आहेत. ट्रेनची तिकिटे काढण्यापासून ते घरातील वीजबिले भरण्यापर्यंत ऑनलाईन पेमेंटमुळे आपलं काम सोप्प झालं आहे. ऑनलाईन पेमेंटसाठी आपण GooglePay, PhonePe, BHIM UPI यासारख्या अँपचा वापर करतो असतो. यातील BHIM UPI ने ग्राहकासाठी खास अशी कॅशबॅक ऑफर आणली आहे. ही ऑफर नेमकी काय आहे आणि यातून कॅशबॅक कसा मिळवायचा हे आज आपण जाणून घेऊयात…

काय आहे ऑफर? BHIM UPI

BHIM UPI वापरून तुम्ही 750 रुपयांपर्यंत कॅशबॅक (Cashback Offer) मिळवू शकता. तुम्ही कोणत्याही मर्चंट पेमेंटवर हा लाभ घेऊ शकता. ही ऑफर मर्यादित काळासाठी आहे. तुम्ही या बंपर ऑफरचा 31 मार्चपर्यंत लाभ घेऊ शकता. या ऑफर अंतर्गत, BHIM ॲप वापरून, तुम्हाला १०० रुपयांच्या पेमेंटवर ३० रुपयांचा कॅशबॅक मिळेल. हा कॅशबॅक अन्न आणि प्रवासाशी संबंधित पेमेंटवर उपलब्ध असेल. याशिवाय तुम्ही रेल्वे तिकीट बुकिंग, वाहतूक, टॅक्सी, आणि बस तिकीट बुकिंगवर देखील कॅशबॅक मिळवू शकता. याशिवाय, BHIM UPI ॲप वापरून तुम्हाला इंधन पेमेंटवर 1% कॅशबॅक मिळू शकतो.

खास गोष्ट म्हणजे, तुमचं हॉटेलचे जेवण सुद्धा स्वस्तात होऊ शकते. कारण BHIM UPI ची ही ऑफर UPI QR कोड वापरणाऱ्या सर्व रेस्टॉरंटमध्ये सुद्धा उपलब्ध असेल. या अंतर्गत सिंगल यूजर्सना जास्तीत जास्त 150 रुपयांचा कॅशबॅक मिळू शकतो. म्हणजेच जर तुम्ही १०० रुपये ५ वेळा भरले तर 150 रुपयांचा कॅशबॅक मिळवू शकतात. परंतु तुम्हाला या सर्व कॅशबॅक ऑफर्सचा लाभ घ्यायचा असेल तर तुमच्याकडे भीम ॲपचे वर्जन 3.7 असणे आवश्यक आहे. त्यामुळे तुमचं अँप अपडेट करा आणि 31 मार्चपर्यंत BHIM UPI च्या कॅशबॅक ऑफर्सचा लाभ घ्या.