हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Bhimashankar Forest) आजपर्यंत तुम्ही अनेक गोष्टींमध्ये, कथांमध्ये मायावी वा जादुई जंगल, रहस्यमयी अभयारण्य यांच्याविषयी ऐकले असेल. पण तुम्ही अशा एखाद्या जंगलाला कधी भेट दिली आहे का? जर तुम्हाला असा काही अनुभव घ्यायचा असेल निसर्गाच्या सानिध्यात जाण्याची संधी शोधात बसू नका. आज आम्ही तुम्हाला ज्या जंगलाविषयी सांगणार आहोत, तिथे जा. कारण हे एक असं जादुई जंगल आहे, जे रात्रीच्या काळ्याकुट्ट अंधारात अत्यंत रहस्यमयी पद्धतीने चमकत. चला तर या जंगलाविषयी अधिक जाणून घेऊया.
रात्रीच्या अंधारात चमकणार जादुई जंगल (Bhimashankar Forest)
निसर्गात अनेक जादुई गोष्टी आहेत. ज्या पाहण्यासारख्या आणि अनुभवण्यासारख्या आहेत. फक्त आपण तिथपर्यंत पोहचायला हवं. तुमच्यापैकी बऱ्याच लोकांना ट्रेकिंगचा नाद असेल. जर तुम्हीही ट्रेकिंग प्रेमी असाल तर आयुष्यात किमान एकदा तरी भीमाशंकरच्या जंगलात नाईट ट्रेकिंगला नक्की जा. कारण इथे रात्रीच्या वेळी जादू होते. एकीकडे रात्र असल्यामुळे सर्वत्र काळोख असतो तर दुसरीकडे भीमाशंकरचे हे जंगल मात्र सोनेरी प्रकाशाने उजळलेले दिसते. ते कसे? हे जाणून घेऊ.
कशामुळे चमकतं?
तुम्ही काजवा पाहिलाय का? जो रात्रीच्या वेळी आपल्या आसपासची जागा प्रकाशमान करतो. होय. तुम्ही बरोबर समजत आहात. भीमावशंकर जंगलात लक्ष लक्ष काजवे आहेत. जे प्रत्येक झाडा पानांवर रात्रीच्यावेळी लुकलुकताना दिसतात. (Bhimashankar Forest) या लुकलुकणाऱ्या काजव्यांमुळेच संपूर्ण जंगल काळ्याकुट्ट रात्रीतसुद्धा प्रकाशमान होतं. काजव्यांचे लुकलुकने एका लयीत असल्याने निसर्ग एखादी जादू वा किमया करतोय असेच वाटते. या काजव्यांचं हे लुकलुकणं पाहण्यात एक अत्यंत वेगळा सुखद अनुभव आहे. जो घेण्यासाठी इथे जायला हवं.
कसे जाल?
भीमाशंकर हे महाराष्ट्रातील सर्वात प्रसिद्ध तीर्थक्षेत्र आहे. हे बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असून येथे कायम भाविकांची गर्दी असते. मात्र, तीर्थक्षेत्रासह हे ठिकाण अभ्यारण्यासाठीदेखील प्रसिद्ध आहे. त्यामुळे अनेक ट्रेकर्स, पक्षी निरिक्षक आणि वनजीवन पाहण्यासाठी उत्सुक पर्यटक इथे आवर्जून भेट देतात. (Bhimashankar Forest) मुंबईपासून साधारण साडेचार तासांच्या अंतरावर म्हणजेच २१३ किलोमीटरवर भीमाशंकर अभयारण्य आहे. त्यामुळे अगदी स्वतःची गाडी घेऊन निसर्ग पाहत एन्जॉय कारतग जाणे अगदी शक्य आहे. मात्र निसर्गाला न्याहाळायचे असेल तर इथे गेल्यानंतर पायीच फिरावे लागेल.