Bhiwandi Lok Sabha 2024 : शरद पवारांचा बाळ्यामामा भाजपसाठी डेंजर हाय…

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मुंबईतला किंवा मुंबईजवळचा मतदारसंघ म्हटलं की त्याला आपसूकच एक व्हेटेज येतं. त्यामुळे मुंबईतल्या जागा आपल्याच पदरात पडाव्यात यासाठी प्रत्येकच राजकीय पक्षात घासाघीस सुरु असते. भिवंडी लोकसभा (Bhiwandi Lok Sabha 2024) मतदारसंघ म्हणूनच सर्वात जास्त महत्वाचा ठरतो. ठाणे आणि पालघर या दोन जिल्ह्यातील काही भाग बनून बनलेला भिवंडी मतदारसंघ हा तसा २००९ साली अस्तित्वात आला. मुस्लिम, आगरी कोळी समाजाचा आकडा सर्वाधिक असल्याने काँग्रेसला इथं लीड घेणं सोप्प गेलं आणि काँग्रेसला भिवंडीतून खासदार पाठवण्याचा पहिला मान मिळाला. मात्र नंतर मोदी लाटेत कपिल पाटील (Kapil Patil) यांनी हे समिकरणच बदलून टाकत सलग दोन टर्म या मतदारसंघावर आपलं निर्विवाद वर्चस्व कायम ठेवलं. म्हणजेच आत्तापर्यंतच्या लढतीत भाजप वर्सेस काँग्रेस अशी थेट लढत होऊनही भाजप इथं वरचढ ठरताना दिसून येते. मात्र आता शरद पवारांनी काँग्रेसच्या (Sharad Pawar) हक्काची असणारी ही जागा आपल्याकडे खेचून आणत बाळ्यामामांना लोकसभेच्या रिंगणात उतरवण्याचा घाट पवारांनी घातलाय. म्हणूनच यंदाच्या निवडणुकीत भिवंडीत भाजपला पवार टफ फाईट देतील का? भिवंडीची राजकीय गणितं नेमकी कशाचा आधारावर ठरतात? कपिल पाटील भिवंडीतून सलग तिसऱ्यांदा खासदार होत नवा इतिहास रचतील का? हेच थोडसं विस्तारानं पण साध्या सोप्या भाषेत समजून घेऊयात

भिवंडी लोकसभा मतदारसंघात लोकसभेसाठी पहिली निवडणूक 1962 साली झाली. त्यावेळी काँग्रेसचे यशवंतराव मुकने हे या मतदारसंघाचे पहिले खासदार म्हणून निवडून आले होते. त्यानंतर पुन्हा 1967 आणि 1971 मध्येही इथं काँग्रेसचेच खासदार निवडून आले. त्यावेळी सोनूभाऊ बसवंत आणि वैजिनाथ धामणकर यांना या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली. पण 1971 च्या मतदारसंघ पुनर्रचनेनंतर 2004 च्या सार्वत्रिक निवडणुकांपर्यंत भिवंडी लोकसभा मतदारसंघ अस्तित्वात नव्हता. 2009 मध्ये पुन्हा हा मतदारसंघ अस्तित्वात आला आणि सुरेश तावरे हे काँग्रेसचे इथले चौथे खासदार म्हणून लोकसभेत पोहोचले. पण त्यानंतर 2014 आणि 2019 अशा सलग दोन निवडणुकांमध्ये कपिल यांच्या रुपानं भाजपला या मतदारसंघात विजय मिळवण्यात यश आलं. त्यामुळे 2024 ला पुन्हा घोडेमैदान मारुन हॅटट्रिक करण्याचा त्यांचा प्रयत्न असणारय.

भाजपच्या Kapil Patil यांना  Suresh Mhatre भिवंडीत टफ फाईट देणार?

भिवंडीतील अलिकडच्या लढतीही फार इंटरेस्टिंग असल्याचंं पाहायला मिळालं. काँग्रेसच्या सुरेश तावरे यांनी 2009 मध्ये काँग्रेसला पुन्हा एकदा या मतदारसंघामध्ये यश मिळवून दिलं होतं. पण 2014 मध्ये पक्षानं त्यांना तिकिट दिलं नाही आणि कपिल पाटील विजयी झाले. 2019 मध्ये भाजपनं कपिल पाटील यांना पुन्हा मैदानामध्ये उतरवलं त्यावेळी काँग्रेसनंही सुरेश तावरे यांच्या माध्यमातून भाजपसमोर कडवं आव्हान उभं करण्याचा प्रयत्न केला. पण त्यात त्यांना यश आलं नाही. या निवडणुकीत कपिल पाटील यांनी पुन्हा एकदा विजय मिळवत सुरेश तावरेंना पराभूत केलं. सुमारे दीड लाखांहून अधिकच्या मताधिक्यानं कपिल पाटील इथून विजयी ठरले. लोकसभा निवडणुकीनंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत याठिकाणच्या 6 पैकी 2 मतदारसंघात शिवसेना, 2 मतदारसंघात भाजप आणि काँग्रेस सपाचे प्रत्येकी एक आमदार विजयी झाले.

खासदार कपिल पाटील यांना 2021 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात राज्यमंत्रिपद मिळालं. पंचायती राज मंत्रालयाच्या कारभाराची जबाबदारी त्यांना मिळाली. शिवसेनेबरोबर भाजपचा सुरू असलेला संघर्ष पाहता, त्यावेळी भाजपची मतदारसंघातली शक्ती वाढवण्यासाठी पाटील यांना मंत्रिपद दिलं असं सांगितलं जातं. पण सध्या शिंदे गट भाजपबरोबरच असल्यानं महायुतीची ताकद चांगलीच वाढली असल्याचं पाहायला मिळतं. भाजपनं आपल्या हक्काची ही जागा कायम ठेवत पुन्हा एकदा कपिल पाटील यांच्यावरच विश्वास ठेवला आहे. तर दुसरीकडे मविआत ही जागा शरद पवार गटाला सुटल्याने इथून बाळ्यामामा ऊर्फ सुरेश म्हात्रे यांंना निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्यात आलं आहे. भिवंडीत पहिल्यांदाच भाजप विरुद्ध राष्ट्रवादी असा थेट सामना होणार असल्यानं या निकालाकडे सगळ्याचंच लक्ष लागून असणारय.

भिवंडी मतदारसंघातील मतदारांच्या संख्येचा विचार करता याठिकाणी मुस्लिम मतदारांची संख्या मोठी आहे. त्यामुळं समाजवादी पार्टी आणि एमआयएम यांची भूमिकाही या निवडणुकीत महत्त्वाची ठरणार आहे. त्यामुळे या दोन पक्षांची भूमिका स्पष्ट झाल्यानंतर भिवंडीत कुणाचं पारडं जड आहे, याची थोडीफार क्लॅरिटी आपल्याला येऊ शकते.