Bhopal 90 Degree Bridge : उड्डाणपुलावर 90 अंशांचा टर्न!! मुख्यमंत्री संतापले; 8 जणांवर कारवाई

Bhopal 90 Degree Bridge
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Bhopal 90 Degree Bridge । भोपाळ मधील ९० अंशांचा टर्न असलेला रेल्वे ओव्हरब्रीज सध्या संपूर्ण देशात चर्चेचा विषय ठरत आहे. ज्या पद्धतीने उड्डाणपुलाची बांधणी झाली आहे, त्यावरून हा पूल सोशल मीडियात गाजत आहे. या पुलाबाबत अनेक मिम्स सुद्धा व्हायरल झाले आहेत. या उड्डाणपुलावर ९० अंशाचा विचित्र टर्न असल्याने काही जणांची टीकेची झोड उठवली तर काहीही चेष्टा मस्करी केली. यानंतर आता मध्य प्रदेश सरकारने या उड्डाणपुलाच्या कामावर नाराजी व्यक्त करत आणि चुकीच्या बांधकामाची दखल घेत संबधित अधिकाऱ्यांवर कारवाई केली आहे. या कारवाई अंतर्गत ८ अभियंत्यांना निलंबित करण्यात आलं आहे. तसेच या संपूर्ण प्रकल्पाची चौकशीही केली जाणार आहे.

बांधकामात झालेल्या गंभीर निष्काळजीपणाची दखल- Bhopal 90 Degree Bridge

मुख्यमंत्री मोहन यादव यांनी ऐशबाग आरओबीच्या बांधकामात झालेल्या गंभीर निष्काळजीपणाची दखल घेतली होती आणि चौकशीचे आदेश दिले. याबाबत मोहन यादव यांनी म्हंटल कि, या प्रकल्पासाठी बांधकाम एजन्सी आणि डिझाइन सल्लागार यांना ब्लॅक लिस्ट मध्ये टाकण्यात आले आहे आणि आरओबीमध्ये आवश्यक सुधारणा करण्यासाठी एक समिती स्थापन करण्यात आली आहे. चौकशी अहवालाच्या आधारे, ८ सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अभियंत्यांवर कारवाई करण्यात आली आहे. दोन मुख्य अभियंत्यांसह सात अभियंत्यांना तात्काळ निलंबित करण्यात आले आहे. एका निवृत्त अधीक्षक अभियंत्याविरुद्ध विभागीय चौकशी केली जाईल तसेच उड्डाणपुलाची सुधारणा झाल्यानंतरच आरओबीचे उद्घाटन केले जाईल,”असं मोहन यादव यांनी म्हंटल.

पीडब्ल्यूडीचे अतिरिक्त मुख्य सचिव नीरज मंडलोई म्हणाले की, दोषपूर्ण डिझाइनसाठी अभियंत्यांवर कारवाई करण्यात आली आहे. त्यात मुख्य अभियंता संजय खांडे आणि जीपी वर्मा, प्रभारी कार्यकारी अभियंता जावेद शकील, प्रभारी उपविभागीय अधिकारी रवी शुक्ला, उपअभियंता उमाशंकर मिश्रा, सहाय्यक अभियंता शानुल सक्सेना, प्रभारी कार्यकारी अभियंता शबाना रज्जाक आणि निवृत्त अधीक्षक अभियंता एमपी सिंह यांचा समावेश आहे.

महामाई बागेपासून ते पुष्पा नगर आणि स्टेशन परिसराला न्यू भोपाळशी जोडण्यासाठी उभारण्यात आलेला हा पूल खर तर (Bhopal 90 Degree Bridge) भोपाळमधील वाहतूक सुरळीत करण्यासाठी बनवण्यात आला होता, पण बांधकामाच्या चुकीच्या पद्धतीमुळे हा पूल चर्चेचा विषय बनला आहे. या पुलासाठी तब्बल १८ कोटी रुपयाचा खर्च झाला आहे.. या पुलामुळे ३ लाखांहून अधिक रहिवाशांचा प्रवास सोपा होईल असा अंदाज होता, मात्र चुकीच्या बांधकामामुळे हा पुलाचा नागरिकांना गैरसोयीचा ठरला आहे.