शंभूराज देसाईंच्या प्रयत्नातून तीन गावांचा पाणी प्रश्न मार्गी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी

महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांच्या प्रयत्नातून दाढोली, मसुगडेवाडी, महाबळवाडी गावासाठी जल जीवन मशीन योजने अंतर्गत नळ पाणी पुरवठा योजना मंजूर झाली आहे. या यायोजनेच्या कामाचा भुमिपुजन सोहळा नुकताच पार पडला.

यावेळी संजय गांधी निराधार योजना समिती पाटणचे अध्यक्ष भरत भाऊ साळुंखे, माजी संचालक प्रकाश नेवगे, लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखाना संचालक प्रशांत पाटील, चंद्रकांत पाटील आदी उपस्थित होते.

यावेळी संचालक प्रशांत पाटील यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. यावेळी शिवदौलत बॅंक संचालक चंद्रकांत पाटील, गोरख चव्हाण, शंकर साळुंखे, सामाजिक कार्यकर्ते मनोहर कडव, शिवाजी बोगाने, राजेंद्र पाटील, सतिश पवार, जयदिप जाधव आदींसह दाढोली, मसुगडेवाडी, बाबरवाडी, महाबळवाडी येथील ग्रामस्थांनी भूमिपूजन कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थिती लावली होती.