Bhusawal To Pune Train : भुसावळमार्गे पुण्याला जाण्यासाठी विशेष ट्रेन; पहा कोणकोणत्या स्थानकांवर थांबणार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Bhusawal To Pune Train | भुसावळहुन पुण्याला व पुण्यावरून भुसावळला जाणाऱ्या लोकांची संख्या ही प्रचंड अधिक आहे. त्यामुळे या मार्गावर आता मुजफ्फरपूर दरम्यान पुणे – मुजफ्फरपूर सुपरफास्ट AC साप्ताहिक विशेष ट्रेन ही काल म्हणजेच 21 डिसेंबरपासून चालवली जात आहे. त्यामुळे या मार्गांवरून प्रवास करणाऱ्या प्रवाश्यांसाठी ही आनंदाची बातमी आहे.

कसे असेल गाडीचे वेळापत्रक?

हि 05286 पुणे – मुजफ्फरपूर सुपरफास्ट एसी साप्ताहिक विशेष एक्सप्रेस 21 डिसेंबरला आणि 28 डिसेंबरला पुणे येथून रात्री 11  वाजता सुटणार आहे. तर शनिवारी 6 वाजता मुजफ्फरपूर येथे पोहचेल. तर 05285 मुजफ्फरपूर-पुणे सुपरफास्ट एसी साप्ताहिक विशेष एक्सप्रेस ट्रेन (Bhusawal To Pune Train) ही 20 डिसेंबरला आणि 27 डिसेंबरला मुजफ्फरपूर येथून दुपारी 1 वाजता निघून ती गुरुवारी रात्री 9 वाजता पुणे येथे पोहचेल.

कोणत्या स्थानकावर थांबेल ही गाडी? Bhusawal To Pune Train

पुणे – मुजफ्फरपूर दरम्यान चालवली जाणारी ही विशेष ट्रेन दौंड कार्ड लाइन, अहमदनगर, कोपरगांव, मनमाड, भुसावळ, खंडवा, इटारसी, जबलपूर, कटनी, सतना, प्रयागराज छिवकी, पं. दीनदयाल उपाध्याय जंक्शन, बक्सर, आरा, दानापूर, पाटलीपुत्र आणि हाजीपूर या स्थानकावर थांबणार आहे.

कशी आहे ही विशेष ट्रेन? 

प्रवास करताना आपण नेहमी पाहतो की गाडी कश्या पद्धतीची आहे. त्यामध्ये जर उत्तम सुविधा असतील तर लांबच्या पल्ल्यासाठी त्या गाडीची निवड केली जाते. त्यामुळे चालवली जाणारी विशेष ट्रेन (Bhusawal To Pune Train) नेमकी कशी आहे? व त्यामध्ये कोणत्या सुविधा असतील? हे जाणून घेणे तेवढेच गरजेचे आहे. या ट्रेनमध्ये एसी फर्स्ट -1, एसी टू- 2, एसी थ्री-11, एसी थ्री इकॉनॉमी-4, जनरेटर कार – 2  तसेच आरक्षण डबे असणार आहेत. त्यामुळे या ट्रेनमध्ये प्रवाश्यांचा प्रवास सोयीचा होईल अशी अपेक्षा आहे.

18 डिसेंबर पासून सुरु होते रिजर्वेशन

विशेष साप्ताहिक ट्रेनचे बुकिंग हे 18 डिसेंबर पासून सुरु करण्यात आले आहे. तसेच गाडीचे रिजर्वेशन हे irctc.co.in वर सुरू आहे. त्यामुळे तुम्हाला जर या मार्गावरून प्रवास करावयाचा असेल तर वेबसाईटवर जाऊन तुम्ही तिकीट बुक करू शकता.