मोठी बातमी! मुंबई महापालिकेच्या आयुक्तपदी भूषण गगराणी यांची नियुक्ती

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| राज्यामध्ये लोकसभा निवडणुका सुरू होण्यापूर्वी मुंबई महापालिकेतील आयुक्त बदलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. बुधवारी मुंबई महापालिकेच्या आयुक्तपदी भूषण गगराणी (Bhushan Gagrani) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. निवडणूक आयोगाने दिलेल्या आदेशानंतर भूषण गगनराणी यांना आयुक्तपद देण्यात आले आहे. त्यांच्यासह ठाणे महापालिका आयुक्तपदी सौरभ राव यांची, नवी मुंबई महापालिका आयुक्तपदी कैलाश शिंदे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

गेल्या काही दिवसांपूर्वी निवडणूक आयोगाने सरकारला मुंबई महापालिकेच्या विद्यमान आयुक्त यांना हटवण्याचे आदेश दिले होते. या आदेशावरूनच मुंबईपालिकेच्या आयुक्त इक्बाल सिंह चहल यांना यांना हटवण्यात आले आहे. त्यानंतर महापालिकेचे नवे आयुक्त म्हणून भूषण गगराणी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. भूषण गगराणी हे 1990 बॅचचे आयएएस अधिकारी आहेत. यापूर्वी त्यांची नियुक्ती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे अतिरिक्त मुख्य सचिव म्हणून करण्यात आली होती. त्यांनी, नगरविकास, जलसंपदा अशी विविध पदे त्यांनी सांभाळली आहेत.

महत्त्वाचे म्हणजे, यापूर्वी ठाणे महापालिका आयुक्त अभिजित बांगर आणि नवी मुंबईचे महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांची तडकाफडकी बदली करण्यात आली होती. तेव्हा देखील केंद्रीय निवडणूक आयोगाच्या आदेशावरून हा निर्णय घेण्यात आला होता. मधल्या काळात निवडणूक आयोगाने मुंबई महापालिकेचे आयुक्त बदलण्याचे आदेश दिले होते. परंतु या आदेशाची अंमलबजावणी राज्य सरकारकडून करण्यात आली नव्हती. त्यामुळे गेल्या दोन दिवसांपूर्वी आयोगाने बदलांचा मुद्द्यावरून राज्य सरकारला दणका दिला होता. त्यानंतर सरकारकडून नवे आयुक्त नियुक्त करण्यात आले आहेत.