शेतकरी आंदोलनातील 700 हून अधिक जणांवर गुन्हा दाखल; पोलिसांची मोठी कारवाई

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| एमएसपीच्या मागणीसाठी पंजाब हरियाणा येथील शेतकरी सरकार विरोधात आंदोलन (Farmers Movement) करत आहेत. समोर आले आहे की, या आंदोलनावर नोएडा प्राधिकरण कार्यालयाला टाळे ठोकणाऱ्या 746 शेतकऱ्यांवर वेगवेगळ्या कलमान अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्राधिकरणाच्या जेईच्या तक्रारीनंतर पोलिसांनी 26 जानेवारी रोजी हे गुन्हे दाखल केले होते. मात्र याबाबत गुप्तता ठेवण्यात आली होती. आता ही बाब समोर आल्यामुळे शेतकरी वर्गात संतापाची लाट उसळली आहे. तसेच हे गुन्हे मागे घेण्यात यावे अशी मागणी केली आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, गेल्या 18 जानेवारी रोजी संतप्त शेतकरी प्राधिकरण कार्यालयाला टाळे लावण्यासाठी आले होते. यामध्ये अनेक पुरुष आणि महिलांचा देखील समावेश होता. त्यांनी कार्यालयाच्या बाहेर येऊन प्राधिकरणा विरोधात घोषणाबाजी केली. तसेच आम्ही कार्यालयात घुसणार देखील आणि टाळे देखील लावणार असे म्हटले होते. यानंतर आमच्या मध्ये कोणी आले तर आम्ही त्याला जिवंत मारून टाकू अशी धमकी या शेतकऱ्यांनी दिली होती.

त्यामुळेच पोलिसांनी या शेतकऱ्यांवर गंभीर कलमाअंतर्गत गुन्हे दाखल केले आहेत. गुन्हे दाखल करण्यात आलेल्यांमध्ये
भारतीय किसान परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष सुखवीर खलीफा यांच्याबरोबर 700 हून शेतकऱ्यांचा समावेश आहे. दरम्यान, नोएडा प्राधिकरणामध्ये काम करणाऱ्या गरीब कुटुंबांना शेतकऱ्यांनी मारहाण केल्याचा आरोप पोलिसांनी लावला आहे. तसेच या शेतकऱ्यांनी गेटवर लावण्यात आलेल्या राष्ट्रीय ध्वजाचा देखील अपमान केला असे तक्रारीत म्हटले आहे. त्यामुळेच आता या शेतकऱ्यांविरोधात पोलिसांनी कारवाई केली आहे.