अंडर-19 महिला विश्वविजेता संघाला 5 कोटींचे बक्षीस; BCCI ची मोठी घोषणा

0
27
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मलेशियामध्ये खेळल्या गेलेल्या महिलांच्या अंडर-19 टी-20 विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात भारतीय अंडर-19 महिला क्रिकेट संघाने दक्षिण आफ्रिकेला 9 गडी राखून पराभव केला आणि सलग दुसऱ्यांदा या स्पर्धेचे विजेतेपद जिंकून इतिहास घडवला आहे . कर्णधार निक्की प्रसादच्या नेतृत्वाखाली भारताने या हि कामगिरी केली आहे. याचेच कौतुक म्हणून BCCI ने 5 कोटी रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे. या बक्षिसामुळे टी-20 विश्वचषक विजेत्या महिला मालामाल होणार आहेत. तर चला जाणून घेऊयात याबद्दल अधिक माहिती .

गोलंदाज त्रिशाने 3 विकेट्स घेतल्या –

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील अंतिम सामना रविवारी 2 फेब्रुवारी रोजी क्वालालंपूर येथे झाला. दक्षिण आफ्रिकेने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, पण भारतीय गोलंदाजांच्या दबावाखाली त्यांचा संघ 82 धावांत ऑलआऊट झाला. भारताच्या फिरकी गोलंदाज त्रिशाने 3 विकेट्स घेतल्या आणि तिच्या उत्कृष्ट गोलंदाजीच्या कामगिरीने संघाच्या विजयास हातभार लावला.

टूर्नामेंटची सर्वोत्तम खेळाडू –

विजयानंतर भारतीय संघाने 12 षटकांत 9 गडी राखून 83 धावांचा कमी धावांचा लक्ष्य सहज पार केला. त्रिशाने फलंदाजीतही नाबाद 44 धावांची जलद खेळी केली आणि तिच्या उत्कृष्ट कामगिरीसाठी तिला सामनावीर आणि टूर्नामेंटची सर्वोत्तम खेळाडू म्हणून गौरवण्यात आले. स्पर्धेत 309 धावा आणि 7 विकेट्स घेतलेल्या त्रिशाचे योगदान महत्वपूर्ण ठरले.

भारतीय संघाला 5 कोटी रुपयांचे बक्षीस जाहीर –

बीसीसीआयने विजेतेपदासाठी भारतीय संघाला 5 कोटी रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे. या बक्षीसाची रक्कम संघातील सर्व 15 खेळाडू, मुख्य प्रशिक्षक नूशीन अल खदीर आणि सपोर्ट स्टाफमधील इतर सदस्यांमध्ये समानरित्या वितरित केली जाईल. याद्वारे बीसीसीआयने आपल्या महिला संघाला प्रोत्साहन दिले असून, ते त्यांच्या यशस्वी कामगिरीसाठी त्यांना सन्मानित करणार आहे.

संघाला आयसीसीने ट्रॉफीसह मेडल्स दिले –

अंडर-19 महिला क्रिकेट विश्वचषकाच्या विजेत्या संघाला आयसीसीने ट्रॉफीसह मेडल्स दिले असले तरी, यापूर्वीच्या नियमांप्रमाणे या स्पर्धेत विजेत्या संघाला रोख बक्षीस प्रदान केले जात नाही. 2023 मध्ये भारतीय पुरुष अंडर-19 संघालाही आयसीसीकडून बक्षीसाची रक्कम मिळाली नव्हती, परंतु बीसीसीआयने यावेळीही 5 कोटी रुपयांचे बक्षीस जाहीर करून आपल्या खेळाडूंना प्रोत्साहित केले.