हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | जे लोक विमानाने नेहमी प्रवास करतात, त्यांच्यासाठी अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे. ती म्हणजे आता विमानाच्या तिकीटाच्या किमती ठरवण्याच्या संदर्भात विमान कंपन्यांनी नियमांमध्ये बदल केलेला आहे. विमान प्रवास हा परवडणाऱ्या दरात व्हावा. तसेच सर्व सामान्यांना देखील विमानाचा प्रवास करता यावा. याकडे सरकारचे नेहमीच लक्ष असते. याबाबतचा सरकारने एक निर्णय घेतलेला आहे. आणि या निर्णयानुसार आता विमान कंपन्या 24 तास अगोदर विमान भाड्यामध्ये कोणताही बदल करणार नाही. याआधी फ्लाईटच्या 24 तास आधी विमान कंपन्यां आ भाड्यांच्या संदर्भात बदल करण्याचा अधिकार होता. परंतु तो अधिकार आता नसणार आहे.
कोणता नियम केला?
सरकार हवाई भाडे नियंत्रित करत नाही. जेव्हा गरज असते तेव्हा, विशेषत: जेव्हा हवाई प्रवासी वाहतूक जास्त असते. तेव्हा, वाढत्या भाड्याच्या बाबतीत सरकार हस्तक्षेप करते, जेणेकरून भाडे जास्त वाढवले जावू नये. आतापर्यंत विमान कंपन्या प्रवासाच्या 24 तास आधी भाडे वाढवू किंवा कमी करु शकत होत्या, असा नियम होता. पण आता हा नियम हटवण्यात येणार आहे. यामुळे प्रवासाच्या काही तास आधीही तिकीट खरेदी केले असल्यास, त्याची किंमत प्रवासाच्या वेळेच्या 24 तास आधी होती तशीच राहणार आहे.
2023 च्या तुलनेत 2024 मध्ये हवाई प्रवास स्वस्त झालेला आहे. तसेच सणासुदीच्या काळात देखील विमानाच्या तिकीटांच्या किमती कमी केलेल्या आहेत. हवाई प्रवासाच्या तिकिटांच्या किमती निश्चित करण्याचा अधिकार विमा कंपन्यांनी स्वतःला देण्यात आलेला आहे. म्हणजेच जेव्हा एखाद्या मार्गावर कमी प्रवासी असतील आणि ऑपरेशनल खर्च जास्त असेल, तर एअरलाइन्स त्यांचे भाडे वाढवून नुकसान वाचवू शकतात. पण जर अतिरिक्त भाडे वाढ केली तर सरकारचे याकडे लक्ष असणार आहे