Credit Card पॉलिसीमध्ये मोठे बदल; ‘या’ बँकांचा आहे समावेश

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । 1 डिसेंबर 2024 पासून भारतातील प्रमुख बँकांनी त्यांच्या क्रेडिट कार्ड पॉलिसीमध्ये महत्त्वपूर्ण बदल केले आहेत. या बदलांचे मुख्य कारण चार्जेस, रिवॉर्ड पॉइंट्स, आणि ट्रान्झॅक्शनशी संबंधित अटींमध्ये होणारे बदल आहेत. ग्राहकांनी या बदलाबद्दल माहिती ठेवणे अत्यंत गरजेचे आहे. कारण यामुळे गरजेचे नसलेले शुल्क टाळता येणार आहे. त्यामुळे क्रेडिट कार्डचा जास्तीत जास्त लाभ घेता येईल.

SBI क्रेडिट कार्ड –

SBI ने 50000 रुपयांपेक्षा अधिकच्या युटिलिटी बिल पेमेंटवर 1% चार्ज लागू केला आहे. तसेच, SimplyCLICK, AURUM, आणि Gold SBI कार्डधारकांना डिजिटल गेमिंग प्लॅटफॉर्म्सवर केलेल्या पेमेंटवर रिवॉर्ड पॉइंट्स मिळणार नाहीत.

ॲक्सिस बँक क्रेडिट कार्ड –

ॲक्सिस बँक क्रेडिट कार्डधारकांसाठी 20 डिसेंबर 2024 पासून कॅश रिडेम्प्शनवर 1 रुपया + 18% GST आणि माइल्स पॉइंट्स ट्रान्सफरवर 199 रुपये + 18% GST आकारले जाणार आहेत. याशिवाय वॉलेट लोड, फ्यूल खरेदी आणि रेंट पेमेंटवर नवीन चार्जेस आणि व्याजदर लागू केले आहेत.

YES बँक क्रेडिट कार्ड –

YES बँकेने रिवॉर्ड पॉइंट्स रिडेम्प्शन पॉलिसीमध्ये बदल केले आहेत. हॉटेल आणि फ्लाइट बुकिंगसाठी रिवॉर्ड पॉइंट्सच्या मर्यादा निश्चित करण्यात आल्या आहेत. YES Private आणि EYES MARQUEE कार्डसाठी रिडेम्प्शन लिमिट जास्त ठेवण्यात आली आहे. 1 एप्रिल 2025 पासून फ्री एअरपोर्ट लाउंज एक्सेससाठी जास्त खर्च करावा लागेल. YES MARQUEE कार्डधारकांना 6 लाउंज व्हिजिट्ससाठी 1 लाख रुपये आणि YES First Preferred कार्डधारकांना 2 व्हिजिट्ससाठी 75000 रुपये खर्च करावे लागतील.

AU स्मॉल फायनान्स बँक क्रेडिट कार्ड –

AU स्मॉल फायनान्स बँकेच्या Ixigo AU क्रेडिट कार्डवर 22 डिसेंबर 2024 पासून रिवॉर्ड पॉइंट्सच्या अटींमध्ये बदल केला जाणार आहे. युटिलिटी, विमा, आणि टेलिकॉम व्यवहारांवर रिवॉर्ड पॉइंट्ससाठी मर्यादा लागू करण्यात आली आहे. सरकारी सेवा, शिक्षण, रेंट पेमेंट आणि BBPS यावर रिवॉर्ड पॉइंट्स मिळणार नाहीत. 23 डिसेंबर 2024 पासून विदेशी खरेदीवर 0% FX मार्कअप लागू केल्यामुळे रिवॉर्ड पॉइंट्स देणे बंद केले जाणार आहे.