1 नोव्हेंबरपासून सर्वसामान्यांचे आर्थिक गणित बिघडणार; LPG गॅस, KYC मध्ये होणार मोठे बदल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| आज ऑक्टोंबर महिन्यातला शेवटचा दिवस आहे. उद्यापासून नोव्हेंबर महिन्याला सुरूवात होईल. परंतु नोव्हेंबर महिन्याच्या 1 तारखेपासूनच तुमचं बजेट बिघडण्याची शक्यता आहे. कारण, 1 नोव्हेंबरपासून अनेक नवे नियम लागू होणार आहेत. रोजच्या आयुष्यात वापरल्या जाणाऱ्या वस्तूंच्या किंमतीत देखील चढउतार होणार आहेत. यामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री बसेल. नोव्हेंबर महिन्यात अनेक सण उत्सव आल्यामुळे एलपीजी सिलेंडरच्या किमतीमध्ये बदल होऊ शकतात, तर जीएसटी ई-चलान यासह इतर काही नियम बदलतील.

LPG गॅस किंमतीत बदल – एक नोव्हेंबर पासून घरगुती सिलेंडरच्या किमती बदलणार आहेत. मात्र यावेळी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एलपीजी गॅसच्या किमती कमी होण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर, सीएनजीचे दरही अपडेट करण्यात येतील. याचा थेट परिणाम ग्राहकांच्या खिशावर होईल.

ई-चलान आणि जीएसटी नियमात बदल – शंभर कोटींपेक्षा जास्त उलाढाल करणाऱ्या व्यावसायिकांना एक नोव्हेंबरपासून 30 दिवसांच्या आत ई-चलन पोर्टलवर GST चलन अपलोड करावे लागणार आहे. हा निर्णय जीएसटी प्राधिकरणाने सप्टेंबरमध्ये घेतला आहे. ज्यामुळे नोव्हेंबर महिन्याच्या 30 दिवसांच्या आत पोर्टलवर ई-चलन अपलोड करावे लागणार आहे.

केवायसी अनिवार्य – 1 नोव्हेंबर पासून भारतीय विमानियमक आणि विकास प्राधिकरणाने सर्व विमा धारकांना KYC करणे अनिवार्य केले आहे. केवायसी न केल्यास तुमचा क्लेम रद्द केला जाणार आहे. त्यामुळे केवायसी करणे अत्यंत महत्त्वाचे असेल.

व्यवहार शुल्क – 1 नोव्हेंबरपासून इक्विटी डेरिव्हेटिव्ह विभागावरील व्यवहार शुल्क वाढणार आहेत. हे बदल S&P BSE सेन्सेक्स पर्यायांवर लागू असतील. ज्यामुळे याचा परिणाम किरकोळ गुंतवणूकदारांवर होईल.

आयात संबंधित अंतिम मुदत – खरे तर, 30 ऑक्टोबरपर्यंत लॅपटॉप, टॅब्लेट आणि इतर इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या आयातीवर सुट देण्यात आली होती. मात्र आज महिला संपत असताना देखील याबाबत कोणतीही गोष्ट करण्यात आलेली नाही. यामुळे नवीन नियम काय बदलतील हे पाहावे लागेल.