Wednesday, March 29, 2023

साताऱ्यात कृषी प्रदर्शनात ‘डॉग शो’ला मोठी गर्दी

- Advertisement -

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके
साताऱ्यात शेतकऱ्यांसाठी छत्रपती कृषी प्रदर्शन भरवण्यात आले आहे. या प्रदर्शनात कृषी औद्योगिक वाहन आणि पशुपक्षी यांचाही अंतर्भाव आहे. सातारकरांनी मोठा उदंड प्रतिसाद दिला असून या प्रदर्शनात शेतकऱ्यांची आणि नागरिकांची प्रचंड गर्दी केली जात आहे. या कृषी प्रदर्शनमध्ये श्वान प्रेमींसाठी ‘डॉग शो’ भरण्यात आला होता. याला श्वान प्रेमींनी मोठ्या प्रमाणामध्ये प्रतिसाद दिला.

सातारा जिल्ह्यासह परजिल्ह्यातीलही शेतकऱ्यांनी या प्रदर्शनाला भेट दिली. शेती उपयोगी साहित्य खरेदी करत नवनवीन तंत्रज्ञानाची माहिती घेतली. या प्रदर्शनात देशातील 200हून अधिक कंपन्यांच्या वतीने 225 स्टॉलची उभारणी करण्यात आली आहे. यामध्ये नामवंत कंपन्यांच्या अत्याधुनिक इलेक्ट्रिक बाइक्स, कृषी अवजारे, गृहपयोगी साहित्य तसेच किसान ड्रोन नागरिकांचे लक्ष वेधून घेत आहेत.

- Advertisement -

शेतकऱ्यांसाठी उपयोगी असणाऱ्या कडबाकुटी मशीन, जडीबुटी संजीवनी आणि आयुर्वेदिक औषधांचे स्टॉल या ठिकाणी उभारण्यात आले आहेत. हा कृषी महोत्सव सातारा पॅटर्न म्हणून नावाजला जाईल, अशी अपेक्षा आयोजकांनी व्यक्त केली आहे.