ठाकरे सरकारचा मोठा निर्णय! ‘या’ दुकानांचा आता अत्यावश्यक सेवेत समावेश

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : संपूर्ण राज्याला कोरोनाच्या दुसऱ्याला लाटेने विळखा घातला आहे. अशा स्थितीत कोरोनावर अटकाव करण्यासाठी राज्यात १ जून पर्यंत लॉकडाऊन करण्यात आले आहे. यामध्ये केवळ अत्यावश्यक सेवांना 7-11 या वेळेत परवानगी देण्यात आली आहे. मात्र इतर व्यापारी वर्गातून देखील दुकाने उघडण्यासाठी मागणी केली जात आहे. त्यात अतिमहत्त्वाचे म्हणजे बांधकाम व्यवसायात येणारा पावसाळा लक्षात घेता व्यापार्‍यांकडून बांधकाम क्षेत्रातील दुकान उघडे ठेवण्याची विनंती करण्यात येत होती. त्यानुसार आता महाराष्ट्र सरकारने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. बांधकाम साहित्याशी संबंधित दुकानांचा अत्यावश्यक प्रवर्गात समावेश करण्यात आला आहे. पावसाळा तोंडावर आला असल्याने नागरिकांच्या सोयीसाठी हा निर्णय घेतला असल्याचं सांगितलं जात आहे.

तसेच तौक्ते चक्रीवादळामुळे कोकणातील अनेक जिल्ह्यांमध्ये घरांची पडझड आणि नुकसान झाले आहे. त्यामुळे कोणतीही नैसर्गिक आपत्ती किंवा संकटात प्रभावीपणे मदत करू शकतील अशा साहित्यांची दुकान व्यवसाय सुरू करण्यास सरकारने परवानगी देऊ केली आहे. त्यामुळे आता शहरांमध्ये हार्डवेअर आणि पावसाळी साहित्याची दुकाने सुरू करता येणार आहेत. अन्य आवश्यक व्यवसायांसाठी देण्यात आलेल्या वेळेतही दुकान सुरू राहतील मात्र कोविड नियमांचे पालन न केल्यास दुकानदारांना १० हजार रुपयांचा दंड ठोठावला जाईल असेही सांगण्यात आले आहे.

पावसाळ्यासंबंधित दुकाने उघडणार

दरम्यान राज्य सरकारने छत्र्या ताडपत्री आणि रेनकोट दुकान उघडण्याची ही परवानगी दिली आहे. पावसाळ्याच्या तोंडावर ग्रामीण भागात घरांची शाकारणी त्याचप्रमाणे शहरी भागात गळती असणाऱ्या ठिकाणी ताडपत्री लावून बंदोबस्त करण्याची आवश्यकता असते. त्यामुळे या दुकानांचा अत्यावश्यक दुकानांच्या यादीत समावेश करण्यात आला आहे.

राज्यातील ‘हे’ जिल्हे रेड झोन मध्ये

नगर , धाराशीव , बुलढाणा , कोल्हापूर , रत्नागिरी , सिंधुदुर्ग , सांगली , सातारा , यवतमाळ , अमरावती , सोलापूर , अकोला , वाशीम , बीड , गडचिरोली हे चौदा जिल्हे रेड झोन म्हणून घोषित करण्यात आले आहेत. या जिल्ह्यांमध्ये कडक निर्बंधांमध्ये घट झालेली नाही. रुग्णसंख्या वाढत असणाऱ्या जिल्ह्यांत घरातच क्वारंटाइन करण्याची सुविधा रद्द करण्यात आली आहे. तिथे कोविड सेंटर किंवा संस्थेमध्येच क्वारंटाइन केले जाणार आहे. कोरोनाबाधित रुग्णांना गृह विलगीकरण ठेवण्यात अर्थ नाही. कारण यामुळे कुटुंबच्या कुटुंब कोरोनाबाधित होतात, असे वडेट्टीवार म्हणाले.

Leave a Comment