सरकारचा मोठा निर्णय!! 75 हजार गोविंदाना विमा कवच जाहीर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | येत्या 6 सप्टेंबर रोजी राज्यात दहीहंडी उत्सव आला आहे. या उत्सवाची गोविंदांकडून मोठ्या जल्लोषात तयारी सुरू करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून (State Government) एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे. राज्य सरकारने गोविंदांसाठी १८ लाख ७५ हजार विमा कवच (insurance cover) रक्कम मंजूर केली आहे. नुकतेच याबाबतचे आदेश जारी करण्यात आले आहेत. शासकीय आदेशानुसार, राज्य सरकारच्या वतीने गोविंदांना शासकीय विमा कवच देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

राज्य सरकारकडून अतिरिक्त 25000 गोविंदाना विमा कवच मिळणार आहे. यातील ५० हजार गोविंदाना शासकीय विमा कवच मिळेल. या निर्णयामुळे राज्यातील 75 हजार गोविंदांना विमा कवच दिले जाईल. राज्य सरकारने प्रो गेविंदा या शासकीय दहिहंडी करता विमा कवच देण्याचा निर्णय घेतला आहे. प्रो गोविंदा दहिहंडी दरम्यान जर एखाद्या गोविंदाचा मृत्यू झाला किंवा तो जखमी झाला तर त्याला विमा कवच लागू होईल.

येत्या ८ सप्टेंबर २०२३ पर्यंत या गोविंदांना विमा कवच लागू राहणार आहे. दरम्यान, राज्यात दहीहंडी निमित्त तरुणांची जोरदार तयारी सुरू झाली आहे. वेगवेगळ्या भागात दहीहंडीची प्रॅक्टिस करण्यात येत आहे. मुख्य म्हणजे, यापूर्वी दहीहंडीच्या अनेक स्पर्धांमध्ये तरुणांवर आपला जीव गमावण्याची वेळ आली आहे. तर काहींना गंभीर दुखापत झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत. त्यामुळेच सरकारने आशा गोविंदांना विमा कवच देण्याचा निर्णय घेतला आहे. ज्याचा फायदा प्रो गोविंदा दहिहंडी दरम्यान घेता येईल.