सेन्सेक्स आणि निफ्टीवर निकालाचा मोठा परिणाम; एका दिवसात तब्बल 29 लाख कोटींचे नुकसान

Share Market
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Share Market News| लोकसभा निवडणुकीच्या निकालाचा मोठा परिणाम शेअर मार्केटवर होताना दिसत आहे. आज सकाळपासूनच सेन्सेक्स आणि निफ्टीत (Sensex And Nifty) मोठी घसरण होत आहे. जाहीर झालेल्या अंकांनुसार आज सेन्सेक्स तब्बल 5000 अंकांनी कोसळला आहे. तर निफ्टीतमध्ये तब्बल 1800 अंकांनी घसरण झाली आहे. त्यामुळे याचा मोठा फटका गुंतवणूकदारांना बसला आहे. सकाळपासून गुंतवणुकदारांचे तब्बल 29 लाख कोटींचे नुकसान झाले आहे.

संपूर्ण देशामध्ये लोकसभा निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर 3 जूनपासून एक्झिट पोलचे अंदाज जाहीर करण्यात आले. या अंदाजावरूनच शेअर बाजारात सेन्सेक्स आणि निफ्टीने विक्रमी उसळी मारली होती. मात्र मंगळवारी मतमोजणी ला सुरुवात होतात शेअर बाजारात पडझड सुरू झाली. आज सेन्सेक्समधील 27 शेअर्स लाल रंगात व्यवहार करत आहेत. यासह बँक, फायनान्शियल, आयटी, ऑटो, मेटल, फार्मा, ही लाल रंगातच व्यवहार करत आहेत.

दरम्यान, लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीदरम्यान आज शेअर बाजार मोठ्या घसरणीसह बंद झाले आहे. पॉवर सेक्टर, पीएसयू बँका, मेटल शेअर्स, टेलिकॉम यासह अनेक क्षेत्रांमध्ये मोठ्या प्रमाणात विक्रीच्या दबावामुळे सेन्सेक्स 4389.73 अंकांनी घसरून 72,079.05 वर आला आहे. ही टक्केवारी 5.74 इतकी आहे. यासह निफ्टीही 5.93% च्या मोठ्या नुकसानानंतर 21,884.50 वर बंद झाला आहे.