तमिळनाडूत फटाक्याच्या कारखान्यात मोठा स्फोट; 8 कामगारांचा मृत्यू तर 6 जण जखमी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| तमिळनाडूमधील (Tamil Nadu) विरुधुनगर येथे असणाऱ्या एका फटाक्याच्या कारखान्याला (firecracker factory) आग लागल्याची दुर्घटना घडली आहे. या दुर्घटनेमध्ये तब्बल 8 कामगारांचा मृत्यू झाला आहे तर 6 जण गंभीर जखमी आहेत. त्यांच्यावर विरुधुनगर जिल्ह्यातील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या दुर्घटनेची माहिती मिळतात अग्निशामक दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली होती. त्यांनी आपल्या प्रयत्नातून ही आग आटोक्यात आणली. मात्र या भीषण आगेमध्ये तोपर्यंत सहा जणांनी आपला जीव गमावला होता.

समोर आलेल्या माहितीनुसार, शनिवारी विरुधुनगर येथील फटाक्याच्या कारखान्यामध्ये अचानक स्फोट झाला. त्यामुळे तातडीने पोलिसांना आणि बचाव पथकाला घटनास्थळी बोलावून घेण्यात आले. यानंतर कारखान्यात असलेल्या इतर कामगारांना बाहेर काढण्यात आले. शेवटी बऱ्याच प्रयत्नानंतर अग्निशामक दलाने ही आग पूर्णपणे विझवून टाकले. मात्र या आगीमध्ये आठ कामगारांना जागीच आपला जीव गमवावा लागला. तर सहाजण जखमी झाले. त्यांच्यावरच रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

सांगितले जात आहे की, ज्या घरामध्ये हा कारखाना सुरू होता ते घर पूर्णपणे उध्वस्त झाले आहेत. घराच्या भिंती कोसळल्या आहेत, तसेच मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे. हा स्फोट कारखान्यातील केमिकल मिक्सिंग रूममध्ये झाला होता. स्फोट झाल्यामुळे कारखान्यात अनेक कर्मचारी काम करत होते. यामध्ये काही महिलांचा देखील समावेश होता. या स्फोटाचा आवाज येतात परिसरातील स्थानिकांनी कारखान्याच्या दिशेने धाव घेतली होती. त्यांनी पोलिसांना माहिती देत घटनास्थळी बोलावून घेतले. यामुळे सहा कामगारांचा जीव वाचला.