शेतकऱ्यांसाठी मोठी खुशखबर!! PM-किसानची रक्कम 10000 रुपये होणार ?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शेतकऱ्यांच्या भल्यासाठी सरकार नेहमी नवनवीन योजना अंमलात आणत असते. या योजनेमुळे त्यांना आर्थिक लाभ मिळून जीवनमान उंचावण्यास मदत होते. शेतकऱ्यांसाठी अशीच फायदेशीर योजना म्हणून पीएम-किसान (पंतप्रधान किसान सन्मान निधी) योजनेकडे पाहिले जाते. आता या योजनेबाबत नवीन अपडेट समोर आले आहे. या योजनेंतर्गत शेतकऱ्यांना दिली जाणारी वार्षिक रक्कम 6000 रुपयांवरून 10000 रुपये करण्याची चर्चा सगळीकडे सुरु आहे. त्यासंदर्भात 1 फेब्रुवारी 2025 रोजी केंद्रीय अर्थसंकल्प सादर होणार असून, या अर्थसंकल्पामध्ये शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा होण्याची अपेक्षा आहे. त्यामुळे अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या घोषणांकडे सर्व शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.

पीएम-किसान योजना –

2018 साली सुरू झालेली पीएम-किसान योजना लहान व अल्पभूधारक शेतकऱ्यांना आर्थिक पाठबळ देण्यासाठी तयार करण्यात आली आहे. सध्या या योजनेमार्फत शेतकऱ्यांना तीन हप्त्यांत 2000 रुपयांचे अनुदान दिले जाते. पण शेतीतील वाढता खर्च आणि महागाई लक्षात घेता, शेतकऱ्यांना या रकमेची वाढ होण्याची अपेक्षा आहे.

फेब्रुवारी 2025 मध्ये 19 वा हप्ता –

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आतापर्यंत या योजनेचे 18 हप्ते वितरित करण्यात आले असून, फेब्रुवारी 2025 मध्ये 19 वा हप्ता मिळण्याची शक्यता आहे. महागाईचा ताण आणि शेतीतील वाढत्या खर्चामुळे शेतकऱ्यांच्या आर्थिक स्थितीत सुधारणा करण्यासाठी ही रक्कम 10000 रुपये करण्यात आल्यास, ग्रामीण अर्थव्यवस्थेला मोठे बळ मिळणार आहे.

रक्कम तीन समान हप्त्यांमध्ये –

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजने अंतर्गत शेतकऱ्यांना 6000 रुपये वार्षिक रक्कम दिली जाते. ही रक्कम तीन समान हप्त्यांमध्ये थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाते. यामुळे शेतकऱ्यांना त्यांचे कृषी संबंधित खर्च पूर्ण करण्यासाठी आर्थिक सहाय्य मिळते. या योजनेचा मुख्य लाभ लहान आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांना होतो. रक्कम ऑनलाइन ट्रान्सफर केली जाते, ज्यामुळे त्यांना ती त्वरित आणि सुरक्षितपणे मिळवता येते.

कोट्यवधी शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा –

सरकारकडून अधिकृत घोषणा अजून झालेली नाही. पण ग्रामीण अर्थव्यवस्था मजबूत करण्याच्या दिशेने हा निर्णय महत्त्वाचा ठरेल. अर्थसंकल्पात अशी घोषणा झाल्यास, कोट्यवधी शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा मिळेल आणि शेतीसाठी आवश्यक गुंतवणूक करण्यास मदत होईल. तुम्हाला जर या योजनेविषयी अधिक माहिती हवी असेल तर, हेल्पलाइन क्रमांक 011-24300606 किंवा 155261 वर संपर्क साधता येईल.