इंदापूर गोळीबार घटनेप्रकरणी धक्कादायक माहिती उघड; 4 आरोपी पोलिसांच्या ताब्यात

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| गेल्या दोन दिवसांपूर्वीच इंदापूर (Indapur) शहराजवळील बायपास हायवे रोडवर असलेल्या हॉटेल जगदंबमध्ये गोळीबाराची घटना घडली होती. या घटनेमध्ये एकाचा खून करण्यात आला होता. आता याच घटनेप्रकरणी पुणे ग्रामीण पोलिसांनी चार जणांना अटक केली आहे. तर, पूर्वीचे वाद असल्यामुळेच संबंधित व्यक्तीला ठार मारण्यासाठी हा गोळीबार घडवण्यात आला होता, असेही तपासातून उघड झाले आले आहे. सध्या पोलीस या घटनेमध्ये सहभागी असलेल्या आणखीन आरोपींचा शोध घेत आहे. (Crime News)

नेमके काय घडले होते?

गेल्या दोन दिवसांपूर्वी मृत्यू झालेला अविनाश बाळु धनवे आपल्या तीन मित्रांसोबत जेवण करण्यासाठी हॉटेल जगदंब येथे गेला होता. जेवणाची ऑर्डर दिल्यानंतर हे चारही मित्र गप्पा मारत बसले होते. याचवेळी आठ जणांच्या टोळीने येऊन अविनाश धनवे याच्यावर गोळीबार केला. ही टोळी हॉटेलमध्ये हातात पिस्तूल, कोयता घेऊन आली होती. त्यामुळे त्यांनी अविनाशवर सपासप कोयत्याने वार केले. हे सर्व भयानक दृश्य पाहून हॉटेलमधून अविनाशच्या मित्रांनी देखील काढता पाय घेतला.

पुढे या घटनेची माहिती मिळतात पुणे ग्रामीण जिल्हयाचे पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी, घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज तपासून घडलेल्या प्रकाराचा छडा लावला. यातूनच हा खून पुर्ववैमन्यसातून करण्यात आला असल्याचे निष्पन्न झाले. दरम्यान, या घटनेसंदर्भात पोलिसांनी माहिती दिली की, खून करण्यात आलेला अविनाश सराईत गुन्हेगार होता. त्याचे आळंदी येथील गुन्हेगारी टोळीसोबत वैमनस्य होते. यातूनच त्याचा खून करण्यात आला. या घटनेची संबंधित असलेले आरोपी कोल्हापूर कडे पळून जात असल्याची माहिती पोलिसांच्या हाती लागली होती. या माहितीच्या आधारावरच त्यांनी चार आरोपींना अटक केली.