विरोधकांना शह देण्यासाठी मोदी सरकारची नवी खेळी; संविधानातून ‘इंडिया’ शब्द वगळणार?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । केंद्रातील मोदी सरकारचा (Modi Government) आगामी २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत पराभव करण्यासाठी देशभरातील तब्बल 28 विरोधी पक्षांनी एकत्र येत इंडिया आघाडीची (INDIA Alliance) स्थापना केली आहे. आत्तापर्यंत या इंडिया आघाडीच्या काही बैठकाही झाल्या असुन मोदी सरकार विरोधात रणनीती आखली जात आहे. इंडिया आघाडीची ही एकी भाजपचं टेन्शन वाढवू शकते. त्यामुळे या विरोधकांना शह देण्यासाठी मोदी सरकारने नवी खेळी आखली आहे. 18 ते 22 सप्टेंबरदरम्यान होणाऱ्या संसदेच्या विशेष अधिवेशनामध्ये इंडिया शब्द हटवण्यासाठी विधेयक येणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत.

मोदी सरकारने संसदेचं विशेष अधिवेशन बोलवले आहे. येत्या 18 सप्टेंबरपासून 22 सप्टेंबरपर्यंत हे विशेष अधिवेशन होणार आहे. या अधिवेशनात विविध विधेयकं मांडली जाणार आहेत. यात राज्यघटनेत मोठा बदल करण्याचा प्रस्ताव मांडला जाणार असल्याची माहिती आहे. देशाच्या राज्यघटनेतील ‘इंडिया’ हा शब्द हटवला जाण्याची शक्यता आहे. संसदेच्या विशेष अधिवेशनात हा प्रस्ताव मांडला जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे . असं झालयास विरोधकांसाठी हा सर्वात मोठा धक्का असेल.

दरम्यान, याबाबत काँग्रेस नेते आणि महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार याना विचारण्यात आलं असता त्यांनी मोदी सरकारवर टीकेची झोड उठवली. केंद्र सरकार विरोधकांच्या इंडिया आघाडीला घाबरले आहेत. भाजपचे लोक डरपोक आहेत. त्यामुळे ते विषयांना फाटे फोडण्याचे काम करत आहेत. हे लोक इंडिया आघाडीला घमेंडीया असे संबोधतात, पण घमेंडी कोण आहे? हे देशाला आणि जगाला माहिती आहे अशी टीका त्यांनी केली. तसेच देशभरातील इंडिया आघाडी मजबूत आहे. पण काहीही केले तरी या सरकारचे अधःपतन इंडियात झाल्याशिवाय राहणार नाही अस म्हणत वडेट्टीवार यांनी मोदी सरकारला इशारा दिला.