AI संदर्भात बिल गेट्स यांची मोठी भविष्यवाणी; म्हणाले, येणाऱ्या 5 वर्षांत संपूर्ण जग…

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| सध्या AI मुळे आधुनिक तंत्रज्ञानाची कायापलट झाली आहे. पुढे जाऊन जगाचे भविष्य देखील AI ठरवेल अशी चिन्हे आतापासूनच दिसण्यास सुरुवात झाली आहे. अशातच मायक्रोसॉफ्टचे को-फाउंडर बिल गेट्स यांनी AI संदर्भात मोठी भविष्यवाणी केली आहे. यावेळी त्यांनी, “येणाऱ्या 5 वर्षांत संपूर्ण जग एआयमुळे बदलून जाईल” असे वक्तव्यं केले आहे.

AI ची प्रगती बघता बिल गेट्स यांनी म्हणणे आहे की, आता लवकरच प्रत्येकाकडे स्वतःचा एक रोबोट असेल. जो युजर्सना अनेक कामात मदत करेल. तसेच इंटरनेट वापरणाऱ्या प्रत्येक दुसऱ्या युजरकडे पर्सनल असिस्टंट असेल. जो आजच्या टेक्नॉलॉजीच्या तुलनेत खूप चांगला असेल. भविष्यातील पर्सनल असिस्टन्ट प्रत्येक काम करण्यास तरबेज असेल. थोडक्यात, पुढील 5 वर्षांत एआयमुळे मानवाचे भविष्य बदलून जाईल”

त्याचबरोबर, आज आपल्याला ट्रिप प्लॅनिंगसाठी ट्रॅव्हल एजन्ट्सना पैसे द्यावे लागतात. जेणेकरून त्यांना आपल्या आवडीप्रमाणे टूरिस्ट स्पॉटही सांगता येतील. परंतु भविष्यात या उलट एआय आपल्या युजर्ससाठी ट्रिप प्लॅनही करू शकते. तसेच, एआय युजर्सना त्यांच्या आवडीच्या पदार्थानुसार, रेस्टोरन्ट्सची माहितीही देईल. तसेच, रिझर्व्हेशन बुक करायचेही काम करेल” असे बिल गेट्स यांनी म्हटले आहे.

दरम्यान, “कंपन्या कर्मचाऱ्यांसाठी एजन्ट्सची सुविधा देऊ शकतात. या एजन्ट्सला मिटिंग्समध्येही सहभागी करता येऊ शकते. जेणे करून त्यांना प्रश्नांची चांगली उत्तरे देता येतील. भविष्यात अशा प्रकारचे एजन्ट्स अत्यंत महागडे असतील. हे तर एजन्ट्स फक्त कार्यालयीन कामेच नाही. तर प्रत्येक ठिकाणी चांगल्या प्रकारे काम करताना दिसतील” असे मत बिल गेट्स यांनी मांडले आहे.