त्रिशूळ मशिदीत काय करतंय ? ज्ञानवापीवरून योगींचा थेट सवाल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । संपूर्ण देशात बहुचर्चेत असणारा ज्ञानव्यापी मशिदीचा निकाल येत्या 3 ऑगस्ट रोजी लागणार आहे. तोपर्यंत न्यायालयाने मशिदीच्या सर्वेक्षणाला स्थगिती दिली आहे. मात्र त्यापूर्वीच मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या प्रकरणासंबंधित महत्त्वाचे वक्तव्य केले आहे. “आपण जर त्याला मशीद म्हटलं, तर वाद होणारच” असं म्हणतच त्रिशूळ मशिदीत काय करतय? असा थेट सवाल योगी आदित्यनाथ यांनी केला आहे. ANI ला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते.

योगी आदित्यनाथ म्हणाले, आपण जर त्याला ज्ञानव्यापीला मशीद म्हटलं तर वाद होणारच. देवाने दृष्टी दिली आहे, त्यामुळे तुम्ही पाहू शकता, त्रिशूळ मशिदीत काय करतय? ज्योतिर्लिंग आहे, देवाच्या प्रतिमा आहेत. त्या भिंती काय सांगतायत? अशी ऐतिहासिक चूक झालीय, त्यावर तोडगा निघाला पाहिजे, असा प्रस्ताव मुस्लिम समाजातून आला पाहिजे असल्याचे म्हणले आहे. आपला देश संविधानावर चालतो, कुठलंही मत किंवा धर्माच्या आधारावर चालत नाही. एक लक्षात घ्या, मी ईश्वराचा भक्त आहे, पण कुठल्याही ढोंगीपणावर विश्वास ठेवत नाही आणि इतरांनीही ठेवू नये. तुमचं मत, तुमचा धर्म तुमच्या घरापर्यंत मर्यादित असू द्या. धर्म हा मशिदीपर्यंत अथवा प्रार्थनास्थळापर्यंत असेल. या गोष्टी रस्त्यावर आणू नका” असं आवाहन देखील योगी आदित्यनाथ यांनी केलं आहे.

इतकेच नव्हे तर, “तुमच्या या गोष्टी तुम्ही इतरांवर लादू शकत नाही. या देशात कोणाला राहायचं असेल तर त्याच्यासाठी राष्ट्र प्रथम असलं पाहिजे. तुमचं मत किंवा तुमचा धर्म यापेक्षा राष्ट्र सर्वात पुढे असायला हवं” असं आदित्यनाथ म्हणाले आहेत. दरम्यान योगी आदित्यनाथ यांनी केलेल्या वक्तव्यावर राजकीय नेत्यांकडून टीका होताना दिसत आहे. तर सोशल मीडियावर देखील योग्य आदित्यनाथ यांच्यावर टीका होत आहे.

समाजवादी पार्टीचे नेते डॉ. एसटी यांनी योग्य आदित्यनाथ यांच्यावर टीका करत, “2024 ची तयारी सुरु आहे. तिथे 350 वर्षांपासून नमाज अदा केली जातेय. तर मशीद म्हणायच नाही, मग काय म्हणायचं?. मुख्यमंत्र्यांनी अशी विधान करु नयेत. चौकशीत स्पष्ट होईल, तिथे काय आहे. संसदेवर त्रिशूळ बनवलं, मग संसेदला मशीद म्हणायच का?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.