एसटी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर!! महागाई भत्त्यात वाढ करण्यास मुख्यमंत्र्यांची मान्यता

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| गेल्या अनेक काळापासून एसटी कर्मचाऱ्यांकडून महागाई भत्तामध्ये (Dearness Allowance) वाढ करण्यात यावी अशी मागणी करण्यात येत होती. या मागणीला धरून कर्मचाऱ्यांनी अनेकवेळा आंदोलने, पत्रव्यवहार, उपोषणे केली. अखेर आज त्यांच्या या प्रयत्नांना यश आले आहे. बुधवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महागाई भत्ता 42 टक्क्यांवरून 46 टक्के करण्यासाठी मान्यता दिली आहे. तसेच याबाबत तात्काळ कारवाई करत हा अहवाल शासनाला सादर करण्यात यावा अशा सूचना देखील दिल्या आहेत. त्यामुळे आता एसटी कर्मचाऱ्यांना (ST Employees) मोठा दिलासा मिळाला आहे.

सध्याच्या घडीला एसटी कर्मचारी अनेक आर्थिक संकटांना सामोरे जात आहेत. त्यामुळेच आपल्या प्रलंबित मागण्यांना घेऊन महाराष्ट्रातील एसटी कामगार संघटनांनी आणि कर्मचाऱ्यांनी मुंबईतील आझाद मैदानावर सलग 9 दिवस उपोषण केले होते. याची दखल घेत मंत्री उदय सामंत यांनी महागाई भत्ता बाबत लवकरात लवकर निर्णय घेतला जाईल असे आश्वासन उपोषणकर्त्यांना दिले होते. तसेच हे आंदोलन मागे घेण्यात यावे अशी विनंती ही केली होती. या विनंतीवरूनच कर्मचाऱ्यांनी आपले आंदोलन मागे घेतले होते.

मुख्य म्हणजे, या बैठकीनंतरच एकनाथ शिंदे यांनी एसटी कर्मचाऱ्यांच्या आर्थिक अडचणी लक्षात घेऊन महागाई भत्ता 42 टक्क्यावरून 46 टक्के करण्यासाठी मान्यता दिली आहे. या एका निर्णयामुळे एसटी कर्मचाऱ्यांना देखील मोठा दिलासा मिळाला आहे. विशेष म्हणजे मुख्यमंत्र्यांनी या निर्णयाचे अंमलबजावणी करत शासनाकडे तात्काळ अहवाल सादर करण्यात यावा असे आदेश दिले आहेत. दरम्यान, एकीकडे एकनाथ शिंदे यांनी एसटी कर्मचाऱ्यांसाठी हा निर्णय घेतला असताना दुसरीकडे निवडणुका आल्यामुळे सरकारकडून महागाई भत्त्यात वाढ करण्यास मान्यता मिळाली असल्याचे म्हटले जात आहे.