Biggest Mall in India: भारतात बनणार सर्वात मोठा मॉल ; मिळणार 3000 लोकांना रोजगार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Biggest Mall in India: पाश्चिमात्य संस्कृतीप्रमाणे भारतात देखील मॉल संस्कृती उदयास आली आहे. भारतभरातल्या मोठ्या शहरांमध्ये मोठ-मोठे मॉल्स पाहायला मिळतात. एवढेच नाही तर लोक तिथे आवर्जून भेटीही देतात. शिवाय हे मॉल उद्योग धंद्यासह अनेकांना रोजगारही उपलब्ध करून देतात. आता भारतात आणखी एक मोठा मॉल बांधला जाणार आहे. युएई मधल्या एका मोठया कंपनीद्वारे हा मॉल बांधला जाणार असून यामुळे जवळपास ३००० हजार लोकांना रोजगार उपलब्ध होणार आहे. हा मॉल नेमका कुठे बांधला जाणार आहे ? कोणत्या कंपनी मार्फत बांधला जाणार आहे?
(Biggest Mall in India) चला जाणून घेऊया सर्व माहिती

UAE चा लुलु ग्रुप भारतात आतापर्यंतचा सर्वात मोठा मॉल बांधणार आहे. एएनआय या वृत्तसंस्थेच्या बातमीनुसार, लुलू ग्रुपचे सीएमडी एमए युसूफ अली भारतातील सर्वात मोठ्या मॉलच्या बांधकामाबाबत खूप उत्साहित आहेत. भारतातील गुंतवणुकीबद्दल आनंद व्यक्त करताना ते म्हणाले की, आपल्या सहकारी नागरिकांना रोजगार उपलब्ध करून देताना मला खूप आनंद होत आहे. याशिवाय केंद्र व राज्य सरकारकडून या संदर्भात पूर्ण सहकार्य मिळत असल्याचे त्यांनी सांगितले.

गुजरातमध्ये होणार मोठा मॉल (Biggest Mall in India)

लुलू ग्रुप भारतातील आतापर्यंतचा सर्वात मोठा मॉल बनवणार आहे. यासाठी लुलू इंटरनॅशनलला गुजरातमधील अहमदाबादमध्ये जमीनही मिळाली आहे. या मॉलच्या उभारणीसाठी सुमारे चार हजार कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. युसूफ अली यांनी दिलेल्या माहितीनुसार, हा मॉल 3,50,000 स्क्वेअर फुटांवर बांधण्यात येणार आहे. लुलू ग्रुपचे सीएमडी एम.ए. युसुफ अली यांनी आशा व्यक्त केली आहे की या वर्षापासूनच त्याचे बांधकाम सुरू होईल. आम्ही तुम्हाला सांगतो की लुलू ग्रुपमध्ये एकूण 65,000 हून अधिक कर्मचारी काम करतात. त्याचा व्यवसाय 42 देशांमध्ये पसरलेला आहे. समूहाची उलाढाल सुमारे 8 अब्ज डॉलर आहे. युसूफ अली म्हणाले की, त्यांनी सुरू केलेला हा सर्वात मोठा प्रकल्प आहे.

मिळणार 3,000 रोजगार (Biggest Mall in India)

मॉलच्या बांधकामामुळे 3,000 मुला-मुलींना रोजगार मिळत असल्याची माहिती लुलू ग्रुप इंटरनॅशनलचे सीएमडी एमए युसूफ यांनी दिली आहे. अशा स्थितीत आपल्या सहकारी नागरिकांना रोजगार उपलब्ध करून दिल्याने त्यांना खूप आनंद होत आहे.

‘या’ शहरांमध्ये लुलू ग्रुपचे मॉल्स

UAE च्या लुलु ग्रुपचे देशातील अनेक शहरांमध्ये मॉल्स आहेत. यामध्ये बेंगळुरू, कोईम्बतूर, हैदराबाद, कोची, लखनौ आणि तिरुवनंतपुरम या शहरांचा समावेश आहे. गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये एका मुलाखतीदरम्यान लुलू ग्रुपचे सीएमडी एमए युसूफ (Biggest Mall in India) यांनी माहिती दिली होती की ते अहमदाबाद आणि चेन्नईमध्ये देशातील सर्वात मोठे शॉपिंग मॉल बनवणार आहेत.