Bikini Beach in Goa : गोव्यातील TOP 5 बिकिनी बीचेस; मिळतात ‘या’ सर्व सुविधा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारताच्या पश्चिम किनारपट्टीवरील गोवा हे देशातील सर्वाधिक प्रसिद्ध पर्यटन स्थळ म्हणून ओळखलं जाते. नैसर्गिक सौंदर्य आणि अथांग समुद्रकिनारे लाभल्याने देशाच्या कानाकोपऱ्यातूनच नव्हे तर अगदी परदेशातून पर्यटक मोठ्या संख्येने गोव्यात दाखल होतात. सध्या पावसाळा सुरु असून पावसाचा मनसोक्त आनंद घेण्यासाठी पर्यटन गोव्यात दाखल होतायत. गोव्यावर अनेक वर्ष पोर्तुगीजानी राज्य केल्यामुळे येथे पाश्चात्य संस्कृतीचा चांगलाच पगडा आहे. भारतातील इतर राज्यात कपडे परिधान करण्याबाबत काही नियम असले तरी गोव्यात मात्र असे कोणतेही निर्बध नाहीत, त्यामुळे गोव्यात तर समुद्रकिनारी बिकनी परिधान करून असंख्य महिला फोटोशूट करताना दिसतात. गोव्याच्या समुद्रकिनारी बिकनी घालने (Bikini Beach in Goa)  हि सामान्य गोष्ट असून परदेशी नागरिकांसह अनेक भारतीय मुलीही याठिकाणी सर्रास बिकनी घालतात. गोव्यात अनेक प्रसिद्ध समुद्रकिनारे आहेत परंतु आज आम्ही तुम्हाला अशा पाच बिकिनी बीचेसबद्दल सांगणार आहोत ज्याठिकाणी मोठ्या संख्येने पर्यटक गोळा होतात.

 

Arambol Beach
Arambol Beac 

 

1. आरंबोल बीच (Arambol Beach)

उत्तर गोव्यात वसलेले आरंबोल बीच हा गोव्यातील सर्वात स्वच्छ समुद्रकिनाऱ्यांपैकी एक असल्याने दरवर्षी मोठ्या संख्येने पर्यटक याठिकाणी जमतात. एकेकाळी या बीच वरून मासेमारी व्यवसाय चांगला चालायचा परंतु हळूहळू हे ठिकाण प्रमुख पर्यटन स्थळात बदलले. हा शांत आणि सुंदर समुद्रकिनारा भारताबरोबर अनेक विदेशी पर्यटकांनाही आकर्षित करत असतो. या बीचचे बिकिनी बीचमध्ये (Bikini Beach in Goa) रूपांतर होण्याचे कारण म्हणजे याठिकाणी जास्त प्रमाणात गर्दी नसते, परदेशी लोकांना शांत वातावरणात निसर्गाचा आनंद घ्यायचा असतो त्यामुळे तुम्ही येथे हजारो परदेशी पर्यटकांना बिकिनी घालून समुद्रकिनाऱ्यावर फिरताना पाहू शकता. हे ठिकाण विदेशी खाद्यपदार्थ आणि जाम सत्र आणि थेट संगीतासह आरामशीर नाइटलाइफसाठी देखील प्रसिद्ध आहे. आरंबोल बीचवर तरुण – तरुणींसाठी जलक्रीडाही उपलब्ध आहेत. आरंबोल बीच वरील एका छोट्या टेकडीवरून आपण पॅराग्लायडिंग आणि डॉल्फिन पाहण्यासारख्या क्रियाकल्पांचा आनंद घेऊ शकतो.

आरंबोल बीचवर कसे जावे –

आरंबोल बीच पर्यंत जाण्यासाठी सर्वात जवळचे रेल्वे स्टेशन हे थिवीम रेल्वे स्टेशन आहे. तर पणजी बस स्थानक पासून आरंबोल बीच जवळपास 34 किलोमीटर अंतरावर आहे.

Ashvem Beach
Ashvem Beach

2. अश्वेम बीच (Ashvem Beach)- (Bikini Beach in Goa)

अश्वेम बीच हा सुद्धा गोव्याच्या उत्तर भागातच येतो. बिकनी घालून फोटोशूट करण्यासाठी अनेक तरुणी अश्वेम बीचवर पर्यटनसाठी जातात. प्रसिद्ध मोरजिम बीचच्या शेजारीच असलेला हा बीच खास करून रशियन पर्यटकांनी भरलेला असतो . याठिकाणी सुद्धा जास्त अशी गर्दी पाहायला मिळत नाही, त्यामुळे ज्या एकांतात समुद्रकिनारी बसायला आवडत त्यांना किंवा ज्या भारतीय मुलींना सर्वासमोर बिकनी घालायला लाज वाटते अशा मुलींसाठी हा अश्वेम बीच बेस्ट पर्याय ठरतो. या बीचवर सर्फिंग, पॅराग्लायडिंग, जेट स्की, विंडसर्फिंग यांसारख्या क्रियाकल्पांचा आनंद तुम्ही घेऊ शकता. अरंबोल बीचप्रमाणेच अश्वेम बीच रात्रीच्या पार्ट्या आणि रेव्ह पार्ट्यांसाठीही प्रसिद्ध आहे.

अश्वेम बीचवर कसे जायचं –

अश्वेम बीच वर जाण्यासाठी पणजीतील कदंबा बसस्थानकावरून बसने जावं लागेल. तसेच जर तुम्ही ट्रेनने प्रवास करण्याचा विचार करत असाल तर जवळचे तेथून 18 किमी अंतरावर थिविम रेल्वे स्टेशन आहे. यापैकी कोणत्याही ठिकाणाहून तुम्हाला सहज आणि आरामात अश्वेम बीचवर जाऊ शकता.

Anjuna Beach
Anjuna Beach

3. अंजुना बीच (Anjuna Beach) –

अंजुना बीच हा सुद्धा गोव्याच्या उत्तर भागातील प्रसिद्ध समुद्रकिनारा आहे. खरं तर, काही वर्षांपूर्वी, हा समुद्रकिनारा नग्न समुद्रकिनाऱ्यांपैकी एक म्हणून प्रसिद्ध होता, परंतु नंतर, प्राधिकरणाच्या निर्बंधांमुळे आणि नग्नतेवर बंदी आल्यानंतर हा बीच बिकिनी बीचसाठी (Bikini Beach in Goa) ओळखला जाऊ लागला. जवळजवळ 2 किमी पसरलेल्या या समुद्रकिनाऱ्यावर बिकनी परिधान केलेल्या अनेक तरुणी तुम्हाला दिसतील. अंजुना बीचवर जेट स्कीइंग, बनाना बोट राईड, पॅरासेलिंग, बम्पिंग राइड्स यांसारख्या विविध प्रकारच्या वॉटरस्पोर्ट्सचा आनंद घेता येतो.

अंजुना बीचवर कस जायचं –

अंजुना बीचवर जाण्यासाठी जवळचे ठिकाण पणजी आहे. पणजीपासून हा बीच सुमारे १८ किमी अंतरावर आहे. याठिकाणी जाण्यासाठी पणजीहुन तुम्ही टॅक्सी किंवा ऑटो-रिक्षाचा वापर करू शकता.

Majorda Beach
Majorda Beach

 4. Majorda बीच (Majorda Beach) –

Majorda बीच हा गोव्याच्या दक्षिण भागात येतो. गोव्यातील सर्वात स्वच्छ समुद्रकिनाऱ्यांपैकी एक म्हणून मोजोर्डा बीच ओळखला जातो. खास करून गोव्यातील बिकनी बीच म्हणून या बीचचे नाव आवर्जून घेतलं जात. हा समुद्रकिनारा पर्यटकांसाठी परिपूर्ण बिकिनी डेस्टिनेशन आणि फोटोग्राफर्ससाठी आकर्षक बिकिनी शूट डेस्टिनेशन ऑफर करतो. Majorda बीच वर सुद्धा तुम्हाला पॅरासेलिंग, बनाना बोट राईड, डॉल्फिन स्पॉटिंग, वॉटर स्कीइंग, स्पीड बोट राईड आणि अनेक खेळांचा मनसोक्त आनंद घेता येईल .

Majorda बीचवर कस जायचं –

मोजोर्डा बीचवर जाण्यासाठी तुम्हाला आधी पणजीला जावे लागेल. तेथून ३० किलोमीटर अंतरावर हा बीच आहे. तुम्ही खासगी वाहनाने अगदी अर्धा तासात पणजीपासून मोजोर्डा बीचवर जाऊ शकता.

Palolem Beach
Palolem Beach

5. पालोलेम बीच (Palolem Beach)-

पालोलेम बीच हा दक्षिण गोव्यातील समुद्रकिनारा आहे. गोव्याच्या सीमेवर वसलेल्या या समुद्रकिनाऱ्याची स्वतःची वेगळी ओळख आहे. जवळपास दीड किलोमीटर लांबीचा हा बीच गोव्यातील पॅराडाईज बीच म्हणूनही ओळखला जातो. तसेच याठिकाणी अनेक तरुणी सर्रास बिकनी घालत असल्याने गोव्यातील बिकनी बीच मध्ये पालोलेम बीचचा समावेश होतो. परंतु या समुद्रकिनाऱ्याचे बिकिनी बीच मध्ये रूपांतर होण्यापूर्वी येथे मासेमारी ओळखला जात होता. परंतु याठिकाणी नंतर महिलांना बिकिनी घालण्याचे स्वातंत्र्य देण्यात आले. महत्त्वाचे म्हणजे या बीचवर महिलांना चांगली वागणूक मिळते, त्यामुळे सुरक्षतेच्या दृष्टीने सुद्धा या बीचवर एन्जॉय करणं योग्य ठरते.

पालोलेम बीचवर कस जायचं –

पालोलेम बीचवर जाण्यासाठी पणजी वरून बसची सोय आहे, परंतु तुम्हाला तेथून ३ तास लागतील. त्याऐवजी तुम्ही खासगी गाडी किंवा कॅबने गेलात तर १ तासात तुम्ही जाऊ शकता. तर रेल्वेने जायचं म्हणलं तर पालोलेम बीचवर जाण्यासाठी सर्वात जवळचे रेल्वे स्टेशन कानाकोना येथे आहे,