हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | गेल्या ९ ते १० सप्टेंबर रोजी दिल्लीत G-20 ची परिषद पार पडली आहे. या परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बायो फ्युएल अलायन्सची घोषणा केली आहे. त्यामुळे या योजनेचे नेमके उद्दिष्ट काय आहे? याचा भारताला काय फायदा होईल? असा प्रश्न विचारला जात आहे. याबाबतची माहिती आपण आज जाणून घेणार आहोत. तर, बायो फ्युएल अलायन्स अंतर्गत जगात कार्बन-आधारित इंधनाचा वापर कमी करणे आणि जैवइंधनाचा वापर वाढवण्यावर भर दिला जाणार आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार, सात G20 देश आणि भारत, अमेरिका, इटली, ब्राझील आणि संयुक्त अरब अमिरातीसह चार देशांनी एकत्र येऊन बायो फ्युएल अलायन्स सुरू केली आहे. पंतप्रधान मोदी यांनी दिलेल्या प्रस्तावात, जागतिक स्तरावर पेट्रोलमध्ये २० टक्के इथेनॉल मिसळावे असे सांगण्यात आले आहे. पेट्रोलमध्ये इथेनॉल मिसळल्याने पेट्रोलवरील पूर्णपणे अवलंबून राहणे कमी होईल. तसेच, या प्रकल्पाच्या मदतीमुळे पर्यावरणाचे रक्षण होण्यास मदत होणार आहे.
भारताने २०२५-२६ पर्यंत पेट्रोलमध्ये २० टक्के इथेनॉल मिसळून इंधन पुरवण्याचे महत्त्वाकांक्षी लक्ष्य डोळ्यासमोर ठेवल आहे. तसेच सध्या २ टक्के इथेनॉल मिश्रित इंधन फक्त काही शहरातच उपलब्ध असले तरी ते संपूर्ण देशात उपलब्ध करून देण्याचा उद्दिष्ट या योजनेअंतर्गत आहे. या दृष्टिकोनातून पाहिला गेले तर, भारतासह जे देश फ्युएल अलायन्ससाठी एकत्र आले आहे त्यांच्यासाठी ही योजना महत्वाची ठरणार आहे. या योजनेमुळे भारताला या क्षेत्रामध्ये गुंतवणूक वाढवण्यास, नवीन तंत्रज्ञान आत्मसात करण्यास आणि सहकार्य निर्माण करण्यात मदत होणार आहे.
दरम्यान, जगातील ८० टक्के जैवइंधन अमेरिका, ब्राझील आणि भारतात तयार होत आहे. तर जगातील ५० टक्के जैवइंधन अमेरिका तयार करते आहे. तसेच, ३० टक्के उत्पादन ब्राझीलमध्ये होते. सध्या यात भारताचा वाटा ३ टक्के आहे. पुढे जाऊन भारत जैवइंधनाचा मोठा उत्पादक आणि ग्राहक बनणार आहे.
जैवइंधन म्हणजे काय?
जैवइंधनाला पर्यावरणीय इंधन म्हणतात. जैवइंधन हे वनस्पती, धान्य, अन्न, कचरा, औद्योगिक कचरा यापासून बनवलेले इंधन आहे. जैवइंधनचा वापर वाढल्यास पेट्रोल आणि डिझेल या पारंपरिक इंधनावरील जगाचे अवलंबित्व कमी होईल आणि पर्यावरणीय प्रदूषणही कमी होईल. सर्वात प्रथम 1890 मध्ये पहिल्यांदा जैवइंधन वापरण्यात आले होते. जेव्हा रुडॉल्फ डिझेलने शेतीसाठी ज्वलन इंजिन चालविण्यासाठी वनस्पती तेलाचा वापर केला होता.