जनरल बिपीन रावत यांच्या अपघाताचं खरं कारण समोर; रिपोर्टमध्ये नेमकं काय ?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । तीन वर्षांपूर्वी देशाचे पहिले चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (सीडीएस) जनरल बिपीन रावत , तसेच त्यांची पत्नी मधुलिका रावत आणि इतर 12 लष्करी अधिकाऱ्यांचा हेलिकॉप्टर कोसळून मृत्यू झाला होता. हि घटना तामिळनाडूच्या कुन्नूरजवळ घडली होती. 8 डिसेंबर 2021 च्या या दुर्घटनेचा अहवाल आता संसदेत सादर केला आहे. संरक्षण विषयक स्थायी समितीने सादर केलेल्या या अहवालानुसार, मानवी चुकांमुळे ही दुर्घटना घडल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

दुर्घटनेमुळे देशात खळबळ –

भारतीय वायुसेनेचे Mi-17V5 हेलिकॉप्टर कोईंबतूरच्या सुलूर हवाई तळावरून वेलिंग्टनमधील संरक्षण सेवा कर्मचारी महाविद्यालयाकडे निघाले होते. उड्डाण केल्यानंतर काही वेळातच हेलिकॉप्टर डोंगरावर कोसळले. या अपघातात शौर्य चक्र विजेते ग्रुप कॅप्टन वरुण सिंग हे सुरुवातीला जिवंत राहिले होते, परंतु आठवडाभरानंतर त्यांचाही मृत्यू झाला. या दुर्घटनेमुळे देशात खळबळ उडाली होती.

विमान अपघातांची नोंदणी –

संसदेत सादर करण्यात आलेल्या अहवालात , 13 व्या संरक्षण योजनेच्या काळात भारतीय वायुसेनेच्या 34 विमान अपघातांची नोंदणी झाली आहे. त्यापैकी 33 वा अपघात जनरल रावत यांच्या हेलिकॉप्टरचा होता. यामध्ये मानवी चूक हे मुख्य कारण असल्याचे सांगण्यात आले आहे . या सर्व अपघातांची चौकशी पूर्ण झाली असून यासाठी योग्य ती पावले उचलण्यात आल्याचेही सांगण्यात आले आहे.

भारतीय लष्करातील एक महत्त्वाचे नेतृत्व –

जनरल बिपीन रावत हे भारतीय लष्करातील एक महत्त्वाचे नेतृत्व होते. देशाचे पहिले सीडीएस म्हणून त्यांनी तीन सैन्यदलांमध्ये समन्वय साधण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावली. त्यांचा अकस्मात मृत्यू देशासाठी मोठा धक्का ठरला. त्यांनी लष्करात अनेक सुधारणा केल्या , त्यामुळे ते आजच्या युवा पिढीमध्ये आदर्श ठरले आहेत. त्यामुळे सरकारकडून या अपघातानंतर सुरक्षाविषयक उपाययोजनांवर अधिक भर देण्यात येत आहे.