खाऊगल्ली | लहान मुलेच काय तर मोठे लोक देखील कारले कडू असल्याने खात नाहीत. मात्र कारल्यात औषधी गुण असल्याने कारले खाल्ले पाहिजे. कारल्याचा कडवटपणा गेला तर सगळेजण कारले आवडीने खातील म्हणूनच कारल्याचे चिप्स ही पाककृती आपण पाहणार आहोत. यात कारले तळल्यामुळे त्यातील कडवट पण नाहीसा होतो. जेवताना तोंडी लावायला, किंवा डब्यात याचा वापर होऊ शकतो.
साहित्य –
१) २ कारले
२) मीठ
३) हळद
४) तेल
कृती –
प्रथम कारले स्वच्छ धुऊन कोरडे करून घ्या. नंतर त्याचे बारीक, गोल काप करा.
त्या कपातून कारल्याचे बी काढून टाका.
कारल्याला मीठ आणि हळद लावून थोडा वेळ बाजूला ठेवा. नंतर कारल्याला सुटलेले पाणी निथळून काढा.
कढईत थोडे तेल टाकून कारल्याचे काप दोनी बाजूनी चांगले कुरकुरीत भाजून घ्या.
तयार आहे कारल्याचे चिप्स.
( टीप – कारल्याचे एकदम काप करून त्याला मीठ आणि हळद लावून ते वाळवून एक भारणीत भरून ठेऊ शकता. जेव्हा हवे असेल तेव्हा तळु शकता. )
इतर महत्वाचे –